शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धक्कादायक! पहिल्या दोन पतींना सोडलं, तिसर्‍याची हत्या, चौथ्या लग्नाची केली तयारी; असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 15:46 IST

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिहारमधील पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली, येथे एका तरुणाचा मृतदेह सापडला. या मृतदेहाच्या तापासात मोठा खुलासा झाला आहे. सासू, सासरा आणि पत्नीने मिळून तरुणाची हत्या केल्याच समोर आलं आहे. काही कारणांमुळे पती आणि पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. एकदा जोराचा वाद झाला यात पत्नीसह घरच्यांनी मिळून पतीची हत्या केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर या हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे. 

ऑफिसच्या पायऱ्या चढताना केला विनयभंग, आसपासच्या लोकांनी रोडरोमिओला हाणले!

तरुणाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर या घटनेचा उलघडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू, सासरा आणि पत्नीने मिळून तरुणाचा गळा आवळून हत्या केली. मृताची पत्नी अस्मारी उर्फ ​​मंजू देवी हिने यापूर्वी दोनदा लग्न केले होते. मृत सुभाष प्रजापतीच्या भावानी या संदर्भात माहिती दिली. त्या महिलेचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध होते आणि तिला चौथ्यांदा लग्न करायचे होते. सुभाष याचा याला विरोध होता. यामुळेच त्या तरुणाची हत्या केली. मयत हा अंमली पदार्थांचे व्यसनी होता, त्यामुळे त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडणे होत होती. 

कुटुंबीयांनी सांगितले की, सुभाष प्रजापती यांचा दोन वर्षांपूर्वी फुलवारी शरीफ भुसौला दानापूर येथील अस्मेरी खातून हिच्याशी विवाह झाला होता. अस्मारी खातून हिचे यापूर्वी दोनदा लग्न झाले होते. दोन्ही पतींना सोडल्यानंतर असगरीने दोन वर्षांपूर्वी सुभाष प्रजापती याच्याशी तिसरे लग्न केले. मृत तरुणाच्या भावाने दिलेली  माहिती अशी, असगरी खातूनने सुभाषसोबत लग्न केले. असगरी खातून यांना दोन पतीपासून दोन मुले आहेत.

सुभाषची पत्नी अजमेरी खातून हिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. पत्नी अजमेरी खातून चौथ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती, याची माहिती सुभाष प्रजापती यांना मिळाली होती. या लग्नाला सुभाषने पत्नी अजमेरी खातून हिला विरोध सुरू केला. या विरोधामुळे पत्नी अजमेरी खातून, सासू अख्तारी खातून आणि सासरे मोहम्मद अलाउद्दीन यांनी मिळून जावयाचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी अगोदरच या तिघांवर संशय व्यक्त केला होता.  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सुभाष प्रजापती यांचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना मृताच्या मानेवर खुणा आढळल्या. त्यानंतर त्यांनी तपासाची दिशा बदलली. सुभाष यांच्या सासरच्या परिसरात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सासरच्या मंडळींची कडक चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस