शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

धक्कादायक! मुख्याध्यापिकेची शाळेत हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 13:33 IST

ही घटना आज सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.

गोंदिया - तालुक्याच्या ईर्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मुख्याध्यापिकेची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेत खळबळ माजली आहे. मुख्याध्यापिका प्रतिभा दिलीप डोंगरे (५१) यांचा कुऱ्हाडीने घाव घालून नवर्‍यानेच हत्या केला. ही घटना आज सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

 प्रतिभा दिलीप डोंगरे (५१) असे खून झालेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. तर दिलीप डोंगरे असे आरोपी पतीचे नाव आहे. घरगुती वादातून त्याने खून केल्याची माहिती आहे. मंगळवारी (दि.२) नेहमीप्रमाणे मुख्याध्यापिका डोंगरे ह्या शाळेत गेल्या,प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. यानंतर सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान दिलीप डोंगरे हा शाळेत आला. तेव्हा एका वर्गात शिक्षिका रंगारी तर दुसर्‍या वर्गात मुख्याध्यापिका डोंगरे विद्यार्थ्यांना शिकवित होत्या. त्यावेळी आरोपी डोंगरे यांच्या वर्गात गेला. त्याने विद्यार्थ्यांच्या समोरच प्रतिभा डोंगरे यांना ओढत शाळेच्या ग्राऊंडमध्ये आणले. यामुळे शाळेत गोंधळ उडाला. आजूबाजूचे लोक हा थरार पाहून गोळा झाले. त्याने प्रतिभाच्या डोळ्याात मिरची पावडर टाकून तिच्यावर सपासप कुऱ्हाडीने वार केले. गळ्यावर, मानेवर, पाठीवर असे वार करून त्यांना क्षणाधार्थ यमसदनी पाठविले. लगेच लोकांच्या हातात लागू नये म्हणून घटना स्थळावरुन पळ काढला. दरम्यान या सर्व प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.प्राप्त माहितीनुसार दिलीप आणि  प्रतिभा यांच्यात मागील तीन चार वर्षांपासून वाद होत असायचा. इर्री येथे राहणार नाही असा पवित्रा प्रतिभाचा असल्यामुळे मागील तीन वर्षापासून ते सर्वच लोक दत्तोरा येथे भाड्याने घर घेवून राहात होते. परंतु चार महिन्यापूर्वी त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने दिलीप खोली सोडून इर्री येथे आला. प्रतिभा दोन मुलींना घेऊन दत्तोरा येथे राहात होत्या. त्या ठिकाणाहून त्या इर्री येथे शिकवायला येत होत्या. इर्री येथे आलेल्या दिलीपला स्वयंपाक करायला कुणी नसल्यामुळे त्याने नागपूरला भावांकडे राहत असलेल्या आपल्या आईला इर्री येथे आणले होते. चार दिवसांपूर्वी त्याने आपल्या आईला नागपूर येथे सोडून दिले. त्याने प्रतिभाला यमसदनी पाठविण्याचा चंग बांधून तो मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान शाळेत आला होता. वृत्त लिहीपर्यंत गोंदिया ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला नव्हता.चारित्र्यावर घेत होता संशयमृतक प्रतिभावर तो चारित्र्याचा संशय घेऊन नेहमी तिच्याशी वाद घालायचा. तीन-चार महिन्यापूर्वी झालेल्या वादाचे हेच कारण असल्यामुळे तो त्यांना सोडून ईर्रीला आला होता. परंतु एकांगी जीवन जगणे व्यर्थ वाटत असावे म्हणून त्याने प्रतिभालाच यमसदनी धाडले. दिलीपच्या विरोधात महिला आयोगात तक्रारदिलीप आपला वारंवार छळ करीत असल्यामुळे प्रतिभाने त्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती, असे बोलल्या जाते. यासंदर्भात त्याची पहिली पेशी सुध्दा झाली होती. पती पत्नीच्या वादात दोन मुलींच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हरपले आहे. गोंदियात अर्जनविस म्हणून काम करणाºया दिलीप डोंगरेच्या या कृत्यामुळे समाजमन ढवळून निघाले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसSchoolशाळा