शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

धक्कादायक...! लोणीकाळभोर येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुलासह मेव्हण्यावर चाकू हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 12:29 IST

पती चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास देतो म्हणून आपल्या मुलासह पत्नी दोन दिवसांपूर्वी भावाकडे राहण्यासाठी आले होते. 

ठळक मुद्दे६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू : पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पठारेवस्ती परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीसह आपला ६ वर्षांचा मुलगा व मेहुण्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. यामध्ये सहा वषार्चा मुलगा जागीच ठार झाला आहे.      या घटनेत आयुष योगेश बसेरे ( वय ६ )याचा मृत्यू झाला आहे. तर त्याची आई गौरी ऊर्फ किरण योगेश बसेरे (वय २६), मामा भारत उत्तम शिरोळे ( वय ३२, रा. तुळजाभवाणी मंदिरासमोर, पठारेवस्ती, लोणी स्टेशन, ता.हवेली) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून योगेश परसराम बसेरे (वय ३५, रा. कदमवस्ती, ता. हवेली ) याने स्वत:वर वार करून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास देतो म्हणून गौरी या आपला मुलगा आयुष याच्यासमवेत दोन दिवसांपूर्वी आपला भाऊ भारत याचेकडे राहण्यासाठी आले होते. भारत शिरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवार ( १३ जून ) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास योगेश बसेरे तेथे आला. व मोठ्याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडलेनंतर त्याने मला पत्नी व मुलाशी बोलायचे आहे असे सांगून त्या दोघांना इमारतीच्या खाली असलेल्या पार्किंग मध्ये घेऊन गेला. ते बोलत असताना भारत जवळ उभे होते.

रात्री ११ वाजून १० मिनिटे वाजण्याच्या सुमारांस त्याने अचानक आपल्या खिशातून चाकू काढला व मांडीवर खेळत असलेल्या आयुष याचे गळ्यावर मारला. हे पाहून गौरी जोरात ओरडली. त्याचवेळी त्याने तिच्या गळ्यावर वार केला. झालेल्या गंभीर जखमेमुळे दोघेही मायलेक खाली कोसळले. आपली बहीण व भाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत हे पाहून भारत शिरोळे हे आपली आई समवेत धावत त्याठिकाणी गेले व त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी योगेश याने भारत यांचे गळयावर वार केला व तो तेथून निघून गेला.हा प्रकार समजताच नजीकच्या लोकांनी त्या तिघांना उपचारासाठी तात्काळ लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तपासणीनंतर आयुष याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दोघांवर उपचार सुरू असताना योगेश याने या तिघांवर हल्ला करून लोणी स्टेशन परिसरात स्वत:च्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिघांना पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे - पाटील ( हवेली ), सचिन बारी ( दौंड ), पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, दगडू हाके यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस