उम्म अल कुवैन - एका १६ वर्षीय अल्पवयीन भारतीय मुलीचा आखाती देशात सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. शारजामध्ये रविवारी ही दुर्देवी घटना घडली. या मुलीने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा डज आहे. मृत मुलगी ही मूळची केरळाची आहे. शुक्रवारी शारजामधील उम्म अल कुवैन येथील सहा मजली अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. एका अल्पवयीन मुलीचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल मदिना पोलीस तपास करत असल्याची माहिती गल्फ न्यूजने दिली आहे.यासंबंधी तपास सुरु असून पोलिसांनी अद्याप पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही असे गल्फ न्यूजने म्हटले आहे. मुलीचे वडील केरळला गेलो होते. मात्र, तिचे नातेवाईक तिच्यासोबत राहत होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता अश्रफ थमारस्सेरी यांनी दिली. अश्रफ यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. उम्म अल कुवैन पोलीस याप्रकरणी पालक आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्ष नोंदवणार असून मृत मुलीचा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे.
धक्कादायक! भारतीय मुलीचा शारजाहमध्ये ६ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 19:18 IST
एका अल्पवयीन मुलीचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता.
धक्कादायक! भारतीय मुलीचा शारजाहमध्ये ६ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
ठळक मुद्देशुक्रवारी शारजामधील उम्म अल कुवैन येथील सहा मजली अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. उम्म अल कुवैन पोलीस याप्रकरणी पालक आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्ष नोंदवणार असून मृत मुलीचा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे.