शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचाच्या पतीची कॉलर पकडली, गावगुंडांनी त्याला तालिबानी शिक्षा दिली, थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 11:34 IST

Crime News: किरकोळ वादामधून एका तरुणाचे दोन्ही हात पाच जणांनी तोडले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्थानिक महिला सरपंचाचा पती आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील होशंगाबाद जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादामधून येथील एका तरुणाचे दोन्ही हात पाच जणांनी तोडले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्थानिक महिला सरपंचाचा पती आहे. पीडित आणि आरोपींमध्ये जुना वाद आहे. त्याचदरम्यान या तरुणाने सरपंचाच्या पतीची कॉलर पकडली. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी या तरुणाचे दोन्ही हात तोडले. ही घटना बाबईमधील चोराहेट गावातील आहे. (shocking incident, Women sarpanch husband chopped man hands in Madhya Pradesh )

मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी तरुणाला पूर्वनियोजित कटानुसार अडवले. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. तसेच तलवारीसारख्या धारदार हत्याराने त्याचे दोन्ही हात कापण्यात आले. जखमी तरुणाला गंभीर अवस्थेमध्ये होशंगाबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

बाबईचे टीआय अशोर बरबडे यांनी सांगितले की, २७ वर्षीय सोमेश चौधरी हा तरुण गावाच्या दिशेने येत होता. त्याचवेळी कालव्याजवळ व्यंकट, केशव, भगवान सिंह, नाती चौधरी आणि मकरंद यांनी त्याला घेरले आणि त्याची दुचाकी अडवली. या पाचही जणांनी सोमेशला मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याचे दोन्ही हात कापले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. जखमी सोमेशला होशंगाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमेश आणि आरोपींमध्ये जुना वाद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आधीही त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यामुळे त्यांच्या रोजच वाद उद्भवत असत. शुक्रवारी सकाळी इटारसी येथील धान्याच्या बाजारात सरपंचांचा पती आणि या तरुणामध्ये वाद झाला. यावेळी या तरुणाने सरपंचांच्या पतीची कॉलर पकडली. सर्वांसमोर कॉलर पकडल्याने तो संतप्त झाला. त्याने या तरुणाला धडा शिकवून बदला घेण्याचा निश्चय केला. त्यातून हा हल्ला करण्यात आला.

हा तरुण बाजारातून माघारी येत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्याला अडवून मारहाण करण्यात आली. तसेच त्याचे दोन्ही हात तोडण्यात आले. हा तरुण कसाबसा घरी पोहोचला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे त्याचे हात जोडता आले नाहीत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश