शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी वडिलांना पेट्रोल टाकून जाळलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 13:58 IST

लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते

सोलापूर - प्रेमाच्या वेडात कोण काय करेल याचा नेम नाही. एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्यास वडिलांनी नकार दिल्याने मोठं हत्याकांड घडलं आहे. संबंधित मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्या बापाला स्वतःच्या मुलानेच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात घडलेल्या या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला. सोहेल बागवान असं आरोपी मुलाचे नाव असून ३० डिसेंबर रोजी ही घटना घडल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली. याप्रकरणी लातूर येथील एक अल्पवयीन मुलांसह तीच्या अल्पवयीन भावालाही पोलिसांनी अटक केली आहे. 

लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु, त्यांच्या लग्नास वडिल अफजल बागवान यांचा विरोध होता. त्यामुळे सोहेल हा आपल्या वडिलांवर चिडून होता. दरम्यान अल्पवयीन मुलगी व तीचा भाऊ  शुक्रवारी सकाळी लातूर येथून पंढरपुरात आले होते. पंढरपुरातील नवीन एसटी बस स्थानकासमोर त्यांनी सोहेल बागवान याची भेट घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तीच्या भावाने  तहसील कार्यालयाजवळ जावून अफजल  बागवान यांची भेट घेवून कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले. 

पंढरपूरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच रिक्षा थांबवून ते पायी पुढे गेले. दरम्यान रस्त्यात दबा धरून बसलेल्या सोहेल बागवान याने वडील अफजल बागवान यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीने व तीच्या भावाने अफजल  बागवान यांचे हातपाय बांधून डोक्यात दगड घालून खून केला. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनं जिल्हा हादरला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPetrolपेट्रोलPandharpurपंढरपूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSolapurसोलापूर