शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत धक्कादायक प्रकार! घराला आग लावून पती-पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By नितीन पंडित | Updated: December 28, 2024 15:48 IST

सुदैवाने शेजारील लोकांच्या मदतीने पत्नी फरिन आसिफ कुरेशी, पती आसिफ कुरेशी दोघेही बचावले

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील निजामपुर पोलिस ठाणे हद्दीत कुरेशी नगर परिसरत पती पत्नी झोपले असताना त्या घराला आग लावून जळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री उघडकीस आला आहे.ज्यामध्ये पती पत्नी भाजल्याने जखमी झाले आहेत. फरिन आसिफ कुरेशी व पती आसिफ कुरेशी अशी जखमी पती-पत्नींची नावे आहेत. दोघेही घरात झोपले असताना मध्यरात्री सुमारे तीन-साडे तीन वाजताच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी घरात असताना अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावून दिली. आरोपी फरार झाले. यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाचीही बाहेरून कडी लावली होती. आगीने पेट घेताच घरात धूर जमा झाल्याने झोपेत असलेले दोघे पती-पत्नी जागे झाले. त्यांनी आरडाओरड करत दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तो दरवाजाही बाहेरून बंद असल्याने दोघांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे होऊन घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.

या दरम्यान पती-पत्नी हे आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना भाजल्याने जखमी झाले आहेत. स्थानिकांनी या दोघांना उपचारासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून घटनास्थळी स्थानिक निजामपूर पोलिस व फॉरेन्सिक पथक दाखल होत घटनेचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhiwandiभिवंडीhusband and wifeपती- जोडीदार