शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चारकोपमध्ये धक्कादायक प्रकार...सहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे आरोपी मोकाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:14 IST

याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

मुंबई - कांदिवलीतील चारकोप परिसरातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये एक विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, २ दिवस उलटले तरी देखील शाळा प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे संतप्त पालकांनी सकाळी शाळेत एकच गोंधळ घातला. या दोषी मुलांवर शाळेकडून कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

सहावी इयत्तेत शिकणारी माझी मुलगी शाळेत आली असताना तिच्या पाठिमागून पाच - सहा मुले येऊन उभी राहिली आणि त्यांनी तिचा स्कर्ट वर करून तिची छेडछाड केली. ती रडत असतानाही शाळेच्या सुरक्षारक्षकाने त्यांना थांबवलं नाही. या घटनेची तक्रार विद्यार्थीनीने जेव्हा मुख्याध्यापिकेकडे केली तेव्हा त्यांनी या घटनेकडे कानाडोळा केला.  शिवाय मुलीलाच दमदाटी करून शांत केलं अशी तक्रार मुलीच्या आईने केली आहे. यानंतर पीडित मुलीच्या आईने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तिथेही त्यांची निराशा झाली. आठ तासानंतरही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली नाही. रात्री दोन वाजता मुलीचं मेडिकल केलं गेलं. सकाळी 11 वाजताही पोलीस शाळेत गेले नाहीत. त्यावेळी पालकांनी त्यांना जाब विचारला असता आपल्याकडे स्टाफ उपलब्ध नसल्याचं तक्रारकर्त्या मुलीच्या आईला पोलिसांनी खेदजनक उत्त्तर दिले. या घटनेचं चांगले, व्यवस्थित दिसेल असे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले नाही. यानंतर, मुलीच्या आईनं आणि शाळेतल्या आणखीन काही पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घातल्यानंतर पोलीस शाळेत हजर झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग