शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
3
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
4
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
5
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
6
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
7
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
8
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
9
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
10
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
11
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
12
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
13
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
14
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
15
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
16
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
17
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
18
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
19
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

धक्कादायक! चोरीचा बनाव रचून पतीनेच केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:19 IST

आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. 

ठळक मुद्देचोरीचा बनाव रचून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे विरार पोलिसांनी तपासात उघड केले विरार पोलिसांनी जबरी चोरी आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

नालासोपारा - विरार पूर्वेकडील इमारतीमध्ये बुधवारी ५० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून घरामधील बेडरूमच्या कपाटामधून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. चोरीचा बनाव रचून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे विरारपोलिसांनी तपासात उघड केले असून आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. चंदनसार रोडवरील साहिल नगरमधील साहिल अपार्टमेंटमध्ये सदनिका नंबर ५ मध्ये राहणाऱ्या उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांची चोरट्याने घरात चोरी करून हत्या केल्याचा बनाव विरार पोलिसांनी उधळून लावला आहे. विरार पोलिसांनी जबरी चोरी आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. कॅटरिंगचा व्यवसाय करणारे आणि उमादेवी यांचे पती श्याम गुप्ता आणि त्यांच्या मुलीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. उमादेवी यांचे पती श्याम सोबत पटत नव्हते, चिडचिड करून दररोज भांडणे करायची, खर्चासाठी पैसेही देत नव्हती, कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे देत नव्हती, तुझ्यामुळे मला अपत्य होत नाही असे अपमानास्पद बोलून शिविगाळ करायची, मुलीला नेहमी मारहाण करायची या सर्व कारणांमुळे पती आणि पत्नी दोघेही नाराज होते. हत्येचा दिवशी पतीने घरातील असलेल्या लोखंडी फ्लॉवरपॉट आणि दगडी वरवंट्याने पत्नीच्या डोक्यात मारून व तिचे डोके भिंतीवर आपटून हत्या केली असल्याचे चौकशी अंती पतीने कबूल केले आहे. तसेच घरात चोरट्यांनी चोरी करून हत्या केल्याचा बनाव केल्याचेही कबूल केले आहे. घरातील चोरी झालेले रोख रक्कम आणि दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहे. घटनास्थळी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भेट दिली होती. नेमकी काय होती घटना?विरार पूर्वेकडील चंदनसार रोडवरील कोपरी नाका येथील तांदूळ बाजार समोरील साहिल नगर मधील साहिल बिल्डिंगमधील सदनिका नंबर 5 मध्ये व्यापारी श्याम दीनदयाल गुप्ता (७०) हे पत्नी उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांच्यासोबत राहतात. बुधवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उमाराणी ह्या एकट्या घरात असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून धारदार हत्याराने डोक्यात व कपाळावर वार करून गंभीर दुखापत करून उमादेवी यांची निर्घृणपणे हत्या केल्यावर बेडरूमच्या कपटामधून ८० हजार रुपये रोख रक्कम, ९० हजारांच्या दोन सोन्याच्या चैनी, १५ हजारांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजारांचे २० ग्रॅम सोन्याचे गंठण, ३० हजारांचे १० ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके, १५ हजारांची ५ ग्रॅम सोन्याची बिंदीया, ३० हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजारांचे २५० ग्रॅम वजनाचे चांदीच्या पायातील पैंजण असा एकूण ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे.  

टॅग्स :MurderखूनRobberyचोरीArrestअटकPoliceपोलिसVirarविरार