शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 19:06 IST

Crime News : दारूच्या आहारी गेलेल्या पतीकडून सुरु असलेली दररोजची मारहाण असह्य झाल्याने पत्नी घर सोडून चालली होती. 

कल्याण : डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली परिसरात राहणारे एका इसमाने घर सोडून जाणाऱ्या पत्नीच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून तिला गंभीर जखमी केले आहे. इतकेच नाही तर यानंतर या इसमाने थेट मालगाडीखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान दारूच्या आहारी गेलेल्या पतीकडून सुरु असलेली दररोजची मारहाण असह्य झाल्याने पत्नी घर सोडून चालली होती. 

काजल (39) आणि राज अगरवाल हे दाम्पत्य आपल्या दोन मुले आणि राज याच्या पित्यासह जुनी डोंबिवली परिसरातील लक्ष्मी निवास या इमारतीत राहते. राज इस्टेट एजंटचे काम करतो. तर काजल ब्युटीपार्लर चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मात्र काही दिवसांपासून राज याचे दारूचे व्यसन वाढले होते.

सतत दारू पिऊन घरी आल्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याने पती-पत्नीमध्ये भांडणे वाढली होती. त्यामुळे त्रासलेल्या काजलने राज याच्याविरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काजल ही आपले सामान घेण्यासाठी पतीच्या घरी आली असता राजने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर घरातून निघून गेलेल्या राज याने रागाच्या भरात भिवंडी येथील खारगाव-वसई मार्गावर मालगाडी खाली झोकून आत्महत्या केल्याचे विष्णूनगर पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण