शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एचआयव्हीग्रस्त असूनही तरुणीशी लग्न केले; पत्नीला लागण झाल्यावर बिंग फुटले

By पूनम अपराज | Updated: January 6, 2020 21:47 IST

कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे२०१७ साली मे महिन्यामध्ये दोघांचे लग्न झाले. यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी साखरपुडा झाल्यानंतरच नवरदेवाची तब्येत बिघडली. एचआयव्हीबाधित पती हा बृहन्मुंबई महापालिकेत नोकरी करतो.  कोर्टाने एचआयव्हीग्रस्त पती आणि सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला

पूनम अपराज / वैभव गायकर

पनवेल -एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराची माहिती लपवून २६ वर्षीय तरुणीसोबत लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात या गुन्ह्याप्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.२०१७ साली मे महिन्यामध्ये दोघांचे लग्न झाले. यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी साखरपुडा झाल्यानंतरच नवरदेवाची तब्येत बिघडली. हे कळल्यानंतर साखरपुडा झालेल्या तरुणीने  यासंदर्भात त्याच्याकडे आजारपणाबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली असता नवरा टाळाटाळ करीत असल्याच्या तिच्या लक्षात आले. कामाच्या ताणामुळे आजारी पडत असल्याचे सासरच्या मंडळींकडून तरुणीला सांगण्यात आले.कामोठ्यात पत्नी राहत असून एचआयव्हीबाधित पती हा बृहन्मुंबई महापालिकेत नोकरी करतो. 

दरम्यान, लग्नानंतर पतीची तब्बेत खालावल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पतीच्या घरच्यांनी साधारण ताप असल्याचे सांगून विषय टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१७ च्या अखेरीस महिला देखील आजारी पडली. त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सासरच्या लोकांनी साधारण ताप असल्याचे तिला सांगितले. तिला संशय आल्याने तिने वैद्यकीय अहवाल तपासला असता तिच्या रक्तात एचआयव्ही व्हायरस असल्याचे आढळून आले. 

त्यानंतर याप्रकरणी फसवणूक झालेल्याप्रकरणी कोर्टाने एचआयव्हीग्रस्त पती आणि सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने संबंधित प्रकरणाचे चौकशीचे आदेश 3 जानेवारी रोजी कामोठे पोलिसांना दिले आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस तपास करीत आहेत. अद्याप याप्रकरणात कोणाला अटक झाली नसल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे यांनी दिली. लग्नानंतर सासरची मंडळी पतीला वारंवार औषध वेळेवर घेतलीस का ? याबाबत विचारणा करत. त्यावर मी कसली औषध विचारली असती, टोलवाटोलवीची उत्तर देऊन तू तुझं काम कर असे सांगितले जाई असे पीडित महिला म्हणाली. 

टॅग्स :HIV-AIDSएड्सPoliceपोलिसCourtन्यायालयmarriageलग्न