शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यातील पादचारी पुलावरून उडी घेत तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:54 IST

रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार; नातेवाइकांचा शोध सुरू

ठळक मुद्देडॉक्टरांनी हद्दीचे कारण दाखवून तिला दाखल करून घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तरुणीची ओळख अद्याप पटली नसून तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे - ठाण्यातील पादचारी पुलावरून उडी घेऊन एका २२ वर्षीय तरुणीने गुरुवारी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना वागळे इस्टेट येथील एलबीएस मार्गावर घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे गंभीर जखमी अवस्थेमध्ये पोलिसांनी तिला कळवा येथील ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी हद्दीचे कारण दाखवून तिला दाखल करून घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वागळे इस्टेटमधील रहेजा कॉम्प्लेक्ससमोरील एलबीएस मार्गावरील पादचारी पुलावरून या २० ते २२ वर्षीय तरुणीने १ जानेवारी २०२० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती खाली कोसळल्यानंतर तिच्या पोटाला, छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला एका रिक्षाचालकाने काही नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्याच हायवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तसेच सिटी स्कॅनची गरज असल्यामुळे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्याचे पत्र या रुग्णालयाने दिले. 

 

त्यानुसार, तिला घेऊन वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पांडुरंग झोडगे आणि तात्यासाहेब बल्लाळ हे छत्रपती शिवाजी रुग्णालयात गेले. मात्र, रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या या जखमी तरुणीला पाहण्यासाठी डॉक्टर बाहेरही आले नाही. शिवाय, वागळे इस्टेट आमच्या हद्दीत येत नाही, असे सांगून तिला रुग्णालयात दाखल करण्यासही तेथील डॉक्टरांनी नकार दिला. त्यावर पोलीस आणि रुग्णवाहिकेसोबत असलेल्या डॉ. डोंगरे यांनीही असा नकार दिला जाऊ शकत नसल्याचा दावा केला. अखेर, नाईलाजास्तव पोलीस तिला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. तिथे रात्रीच्या वेळी सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध नव्हती. या सर्व प्रक्रियेत तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने २ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास या तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव अधिक तपास करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने तिला दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलीस वर्तुळातूनही या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे. या तरुणीची ओळख अद्याप पटली नसून तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याthaneठाणेPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल