मुंबई - कफपरेड राहणाऱ्या एक १३ वर्षाच्या मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी तिघांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिघांचा शोध सुरु आहे. कफपरेडमधील एका वस्तीमध्ये राहणारी मुलगी दररोज घराजवळील कचराकुंडीत सोमवारी रात्री कचरा टाकण्यासाठी जात असताना तीन तरुणांनी तिला गाठले. आरडोओरड होऊ नये यासाठी तिचे तोंड बंद केले आणि जबदस्तीने येथील एका खोलीत घेऊन गेले. या खोलीत तिघांनी तिच्यावर लैगिक अत्याचार केला. यामुळे या मुलीला जबर मानसिक धक्का बसला. घरी येऊन ती काहीच बोलण्याच्या मनः स्थितीत नव्हती. आईने कशीबशी समजूत काढून तिला बोलते केले आणि घडलेला प्रकार जाणून घेतले. त्यावेळी परिसरातील तीन मुलांनी लैंगिक शोषण केल्याचे तिने सांगितले. आईने मुलीला घेऊन कफ परेड पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत तक्रार केली. प्रकरण पोलिसांत गेल्याचे समजताच तिघांनी पळ काढला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके काय घडले हे सांगता येईल, असे कफ परेड पोलिसांनी म्हटले आहे.
धक्कादायक! कचरा टाकण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 14:51 IST
कफ परेड पोलिसांनी तिघांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
धक्कादायक! कचरा टाकण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
ठळक मुद्देसोमवारी रात्री कचरा टाकण्यासाठी जात असताना तीन तरुणांनी तिला गाठले. आरडोओरड होऊ नये यासाठी तिचे तोंड बंद केले आणि जबदस्तीने येथील एका खोलीत घेऊन गेले. आईने मुलीला घेऊन कफ परेड पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत तक्रार केली.