शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मित्राने लैंगिक शोषणाला प्रतिकार केल्याने मित्रानेच केला खून   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 19:45 IST

याप्रकरणी त्या मुलासह त्याच्या सहकाऱ्यालाही साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तो दोघेही अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे मित्र हरवल्याची खोटी बतावणी करत त्याच्या कुटुंबियांसह तोही मित्राला शोधण्यासाठी त्यांच्याबरोबर फिरत होता.

ठळक मुद्देमुलाने मित्रावर लैंगिक अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला होतापोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - 15 वर्षीय मुलाने त्याच्याच 10 वर्षाच्या मित्राचा खून करून त्याचा मृतदेह साकीनाक्यातील नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक कबूली दिली आहे. या घटनेमुळे साकीनाका परिसरात खळबळ माजली आहे.  या मुलाने मित्रावर लैंगिक अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्या मुलासह त्याच्या सहकाऱ्यालाही साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तो दोघेही अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे मित्र हरवल्याची खोटी बतावणी करत त्याच्या कुटुंबियांसह तोही मित्राला शोधण्यासाठी त्यांच्याबरोबर फिरत होता.

गुरुवारी सायंकाळी साकीनाका परिसरातून 10 वर्षाचा मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्या शेजारी राहणाऱ्या 15 वर्षाच्या मुलाने त्याला खेळण्यासाठी सोबत नेले होते. मात्र, रात्री उशीरापर्यंत तो परत आला नाही. त्याच्या वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली. त्यांच्यासह तो 15 वर्षाचा त्याचा मित्रही होता. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांना गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एक निनावी फोन आला. तुमच्या मुलाचे आम्ही अपहरण केले आहे. तो जिवंत पाहिजे असल्यास ५ लाख रुपये द्या अशी मागणी फोनवरून करण्यात आली. पोलिसांनी या फोनचा माग काढला असता, तो संपर्क क्षेत्राबाहेर येत होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली. हरवलेला मुलगा त्याच्या 15 वर्षाच्या मित्रासोबतच शेवटी दिसला होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्याने पोलिसांनाही तो हरवल्याची बतावणी केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

‘सायंकाळी मित्राला घेऊन मी सार्वजनिक शौचालयात गेलो. तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आरडाओरडा केल्यामुळे मी रागाच्या भरात त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरून साकीनाक्याच्या नाल्यात फेकला’, अशी खळबळजनक माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी नाल्यामध्ये मुलाचा मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्यावर कोणालाही संशय येऊ नये, म्हणून त्याच्या वडिलांसह त्याला शोधायला गेल्याचेही त्याने सांगितले. तो हरवला आहे, यावर सगळ्यांचा विश्वास बसावा यासाठी एका फोनवरून त्याच्या वडिलांना फोन करून त्याचे अपहरण केल्याचे सांगत ५ लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर ते सिमकार्डही फेकून दिल्याचे त्याने सांगितले. त्याला फोन करण्यासाठी मोबाईल देणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या मुलाने शाळेत याआधीही चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळArrestअटकKidnappingअपहरण