शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 12:24 IST

पीडित तरुणी सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने या प्रकाराला फुटली वाचा...

ठळक मुद्देमुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात दिली फिर्याद

राजगुरुनगर; कनेरसर (ता. खेड ) येथे मतिमंद मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संशयित महेश पोपट दौंडकर यांच्या विरोधात मुलीच्या आईने खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित मुलगी जन्मजात मतिमंद आहे. सहा महिन्यापुर्वी मुलीच्या घरातील आईवडील शेतात कामासाठी व दोन लहान बहिणी शाळेत गेल्यावर पीडित मुलीच्या घराशेजारी राहणारा संशयित महेश दौंडकर याने घरी व आजुबाजुला कोणी नसल्याचा फायदा घेत मतिमंद मुलीच्या घरात जात जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर नंतर जीवे मारण्याची धमकी देत असे. दरम्यान, काही दिवसांनी पीडित मुलगी आजारी असल्याने आईवडिलांनी तिला उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले होते.  आई वडिलांनी तिला मोशी येथील चैतन्य महिला संस्था येथे दाखल केले होते. या घटनेबाबत चैतन्य महिला संस्थेने खेड पोलिसांना माहिती दिली होती.खेड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस सुरेखा भोर यांनी पीडित मुलीचे समुपदेशन करुन विचारले असता तिने घराशेजारील महेश दौंडकर उर्फ पिंट्या याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बलात्कार केला तसेच याबद्दल कोणास काही सांगितले तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे सांगितले. भीतीपोटी अत्याचार झालेल्या मुलीने याबाबत कोणास काही सांगितले नाही. मात्र, ६ महिन्याची गर्भवती राहिल्याने याला वाचा फुटली आहे. याबाबत संशयित आरोपी महेश दौंडकर यांच्या विरुध्द खेड पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर घरात कोणी नसल्याचा फायदा घेत शेजारीच राहणार्‍या दौंडकर या नराधमाने बलात्कार केला आहे. त्याचप्रमाणे मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरी केली.आरोपीला कठोर शासन करीत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडित मुलीच्या आईवडिलांनी केली आहे.

याप्रकरणाचा पुढील तपास खेड उपविभागीय पोलिस आधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सतिश गुरुव, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख, हवालदार बाळकृष्ण साबळे, महिला पोलिस हवालदार सुरेखा भोर करत आहे. 

टॅग्स :KhedखेडRapeबलात्कारPoliceपोलिसDivyangदिव्यांगWomenमहिला