शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सिगारेट शेअर करण्यास नकार दिल्याने केला गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 19:19 IST

अमिर खान असं या गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचं नाव आहे.

ठळक मुद्देगोळीबारात अमिर खानच्या छातीच्या डाव्या भागाला दुखापत झाली आहे.  बाईकवरील एका व्यक्तिने गोळी झाडली आणि बाईकवर बसलेले दोघेही पसार झाले.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सिगारेट शेअर करण्यास नकार दिल्यानं 23 वर्षीय तरूणावर दोन अज्ञात दुचाकीस्वाराने गोळी झाडली आहे. दिल्लीतील शालीमार बागेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अमिर खान असं या गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचं नाव आहे. गोळीबारात अमिर खानच्या छातीच्या डाव्या भागाला दुखापत झाली आहे. 

बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अमिर खान आणि त्याचा मित्र एका शॉपिंग मॉलजवळ उभे होते. यावेळी बाईकवरून दोन जण आले. त्यानंतर त्यांनी सिगारेट शेअर करण्यास सांगितले. मात्र, अमिर खान आणि त्याच्या मित्राने सिगारेट देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची देखील झाली. दरम्यान, बाईकवरील एका व्यक्तिने गोळी झाडली आणि बाईकवर बसलेले दोघेही पसार झाले.

या गोळीबारामध्ये अमिर खान जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. यापूर्वी देखील दिल्लीमध्ये ऑगस्ट 2018 साली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करत त्याला भोसकलं होतं. या कर्मचाऱ्यांनी सिगरेटचं दुकानं कुठे आहे? असं विचारल्यानंतर सांगण्यास टाळाटाळ केली होती. यामध्ये त्याचा चुलत भाऊ जखमी झाला होता. तसेच मार्च 2018 साली देखील सिगारेट देण्यास नकार दिल्यानं 22 वर्षाच्या कॉम्प्युटर डिझायनरला चाकूने भोकसलं होतं. 

टॅग्स :Firingगोळीबारdelhiदिल्लीPoliceपोलिसCigaretteसिगारेट