शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 15:58 IST

जावळीचा तरुण, घरच्यांपासून दुरावल्याची व्यक्त केली खंत

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागले असता त्याचा भाऊ व वहिनी गावी गेले होते.लॉकडाऊनमुळे घरच्यांची भेट होत नसल्याने तो एकांतामध्ये रडत बसायचा. याच नैराश्यात सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळ दरम्यान त्याने राहत्या घरात आत्महत्या केली. 

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - लॉकडाऊनमुळे एकाकी पडलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरनेत घडली आहे. त्याठिकाणी तो भाऊ आणि  वहिनीसोबत रहायला होता. परंतु लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सर्वजण गावी तर तो एकटाच कोपरखैरनेत अडकला होता.सुरज सखाराम सुर्वे (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो इंजिनियर असून ऐरोलीतील एका कंपनीत नोकरीला होता. तर जावळी येथील डांगरेघर त्याचे मूळ गाव आहे. मंगळवारी दुपारी कोपरखैरणे सेक्टर 4 येथील राहत्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. अविवाहित असल्याने तो त्याठिकाणी तो भाऊ व वहिनीसह राहायला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागले असता त्याचा भाऊ व वहिनी गावी गेले होते. त्यानंतर लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे तो एकाकी पडला होता. त्यामुळे परिसरातच राहणाऱ्या परिचयाच्या कुटुंबाकडून त्याला जेवण दिले जात होते. परंतु त्याला कुटुंबापासून दुरावल्याची खंत वाटत होती. घरच्यांसोबत नियमित फोनवर बोलून देखील त्याला प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली होती. परंतु लॉकडाऊनमुळे घरच्यांची भेट होत नसल्याने तो एकांतामध्ये रडत बसायचा. याच नैराश्यात सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळ दरम्यान त्याने राहत्या घरात आत्महत्या केली. 

तपासणीसाठी मोटार थांबवल्याच्या रागातून पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ

 

PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी

 

Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल 

 

मंगळवारी दुपारी परिसरात राहणारी परिचयाची व्यक्ती त्याच जेवण घेऊन घरी गेली होती. परंतु त्याने दरवाजा न उघडल्याने पोलिसांना कळवण्यात आले. यावेळी दरवाजा तोडला असता आतमध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले. तसेच आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिट्टी देखील आढळून आली. त्यामध्ये लॉकडाऊनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. लॉकडाऊन मुळे घरी एकटाच असल्याने घर खायला उठत आहे. घरच्यांची सतत आठवण येते परंतु भेट होऊ शकत नाही. तर लॉकडाऊन अजून किती वाढेल त्याचीही खात्री नाही. यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिट्टीत म्हटले आहे. याप्रकरणी कोपर खैरणे पोलिसठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेवरून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर लॉकडाऊन लागू झाल्यापासूनaअवघ्या महिन्यात शहरात झालेली हि आत्महत्येची चौथी घटना आहे. दरम्यान त्याच्या आत्महत्ये मागे नोकरीच्या कारणांचा समावेश आहे का ? याचा देखील कोपरखैरणे पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या