शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मृत वडिलांनी स्वप्नात येऊन सांगितले म्हणून मुलाने केली आईची हत्या, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 15:12 IST

Crime News : आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.

बडोदा - आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. गुजरातमधील बडोदा येथे मुलाने अजब कारण देऊन आईची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर या मुलाने आईचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळूल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घरी आलेल्या बहिणीने आईच्या हत्येचे कारण विचारल्यावर या विक्षिप्त मुलाने दिलेले उत्तर धक्कादायक आहे. मृत्यू पावलेल्या वडिलांनी आपल्याला स्वप्नात येऊन आईला वर पाठवण्यास सांगितले, म्हणून मी तिला ठार केले, असे त्याने सांगितले.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिव्येश असे या मुलाचे नाव असून, त्याने आपल्या ५० वर्षीय आईच्या छातीत आणि पोटात काच घुसवून तिची हत्या केली. त्यानंतर या आईचा मृतदेह घरामागच्या आवारात नेवून त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला. मृतदेह पेटल्यानंतर त्याच्या शेजारी उभे राहून त्याने 'ओम नम: शिवाय'चा जप सुरू केला. यादरम्यान शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहून पोलिसांना खबर दिली.याबाबत माहिती देताना आरोपीच्या बहिणीने सांगितले की, जेव्हा मी घरी आले तेव्हा मी माझ्या भावाला विचारले की, तू आईला का मारले? तेव्हा त्याने मला वडिलांनी स्वप्नात येऊन आईला आपल्याकडे पाठवण्यास सांगितल्याची कहाणी सांगितली.या प्रकरणातील आरोपी असलेला २७ वर्षीय दिव्येश बारिया हा पेशाने ड्रायव्हर आहे. सोमवारी रात्री दिव्येशने आईची हत्या केली होती. तसेच हत्येनंतर तिचा मृतदेह दहन केला होता. दरम्यान, दिव्येश याला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनFamilyपरिवार