शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 14:00 IST

तरुणाला त्याच्या वडिलांच्या जागी नोकरी मिळवायची होती आणि त्यासाठी त्याने आपल्या 55 वर्षांच्या वडिलांची हत्या केली. त्यासाठी त्याने त्याची आई आणि भावाची मदत घेतली. 

ठळक मुद्देया संपूर्ण घटनेत आरोपी तरुणाची आई आणि भाऊ यांनीही या तरूणाला हत्या करण्यास पाठिंबा दिल्याचं निष्पन्न झालं आहे.26 मे रोजी टॉवेलने वडिलांचा गळा आवळून खून केला. नंतर, त्या तरूणाने संपूर्ण गावाला सांगितले की, त्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

तेलंगणामधून हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. येथे पीएसयूची नोकरी मिळवण्यासाठी चक्क एका तरूणाने वडिलांची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, या तरुणाला त्याच्या वडिलांच्या जागी नोकरी मिळवायची होती आणि त्यासाठी त्याने आपल्या 55 वर्षांच्या वडिलांची हत्या केली. त्यासाठी त्याने त्याची आई आणि भावाची मदत घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेत आरोपी तरुणाची आई आणि भाऊ यांनीही या तरूणाला हत्या करण्यास पाठिंबा दिल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित त्यावर कारवाई करण्यास सुरवात केली. आरोपींनी त्यासाठी आधीच संपूर्ण कट आखला होता. संपूर्ण गावात या तरूणाने सांगितले की, त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.25 वर्षांचा आरोपी हा पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक आहे. 26 मे रोजी टॉवेलने वडिलांचा गळा आवळून खून केला. नंतर, त्या तरूणाने संपूर्ण गावाला सांगितले की, त्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, या हत्येत सहभागी असलेल्या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांची आई अद्याप बेपत्ता आहे.मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला हत्येसाठी वापरलेले दोन मोबाइल फोन आणि टॉवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनुकंपा कारणास्तव नोकरी मिळण्यासाठी आई आणि मुलांनी अशा तीन जणांनी मिळून हा कट आखला. पेडपल्ली जिल्ह्यातील गोदावरीखानी येथील संगारेनी कोळशाच्या खाणीत या युवकाचे वडील पंप ऑपरेटर होते.मोठ्या मुलाने रात्री वडिलांची हत्या केली आणि दुसर्‍या दिवशी कुटुंबाने सर्वांना सांगितले की, त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. काही लोकांना संशय आला आणि त्यांनी  पोलिसांना सांगण्यासाठी दबाव आणला, त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आणि तपास सुरू केला.पोलिसांनी भादंवि कलम ३०२, १२०-बी आणि ३४ अन्वये तक्रार दाखल केली आहे. संगारेनी कोळसा खाण राज्य आणि केंद्र सरकारबरोबर संलग्न काम करते आणि नोकरीदरम्यान एखाद्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली जाते.

 

अन्य महत्वाच्या बातम्या :

खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल

 

३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत

 

आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित 

 

उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक

टॅग्स :MurderखूनTelanganaतेलंगणाjobनोकरीPoliceपोलिसArrestअटक