शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! भाच्याने मामाला जिवंत जाळले; तळेगाव दाभाडे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 20:19 IST

घरात झोपू न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दारू पिऊन आलेल्या आरोपीने दिली होती.

ठळक मुद्देआरोपीला न्यायालयीन कोठडी

तळेगाव दाभाडे : भाच्याने मामाच्या डोक्यात दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यास जिवंत जाळले. तळेगाव दाभाडे येथील जाधव चाळ येथे मंगळवारी (दि. २०) पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान खुनाचा ही घटना घडली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विजयसिंग भगवानसिंग जव्हेरी (वय ५५), असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी मीना विजयसिंग जव्हेरी (वय ४७, रा. जाधव चाळ, डाळआळी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिलीे. नारायणसिंग विजयसिंग जव्हेरी (वय २५), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुदर्शन व त्यांची पत्नी विशाखा तसेच त्यांचा एक वर्षांचा मुलगा हे मध्यप्रदेशात इंदूर येथे राहतात. फिर्यादी यांचे पती विजयसिंग जव्हेरी यांची वीस वर्षांपूर्वी ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया झाली होती. पाच ते सहा महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. पती आजारी असल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या ओळखीच्या लीलाबाई चव्हाण यांना मदतीसाठी बोलावले होते. 

दरम्यान, फिर्यादी यांचा लहान भाऊ विजयसिंग गुलाबसिंग जव्हेरी हे कुटुंबासह तळेगाव दाभाडे येथे राहण्यासाठी आले होते. फिर्यादी यांच्या घराशेजारी एका खोलीत ते वास्तव्यास आहेत. फिर्यादी यांच्या या भावाचा मुलगा आरोपी नारायणसिंग हा दारू पिऊन त्याच्या कुटुंबियांना त्रास देत असे. मंगळवारी पहाटे तो फिर्यादी यांच्याकडे आला. घराच्या दरवाजावर लाकूड मारून दरवाजा उघडला. त्यावेळी त्याच्या हातात सिमेंटचा दगड होता. घरात झोपू न दिल्यास मारून टाकण्याची आरोपी नारायणसिंग याने धमकी दिली. त्यामुळे लिलाबाई चव्हाण आणि फिर्यादी या घाबरून घरातून बाहेर पळाले. त्यानंतर नारायणसिंग याला घरात कोंडून ठेवले. बाहेरून दरवाजाची कडी लावली. त्यानंतर लिलाबाई चव्हाण आणि फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरातून धूर येत होता. आरोपी याने फिर्यादी यांच्या पतीला जाळूल्याचे दिसून आले. यात फिर्यादी यांच्या पतीचा मृत्यू झाला.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसMurderखूनPoliceपोलिसArrestअटक