शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

धक्कादायक! एकट्या राहणाऱ्या वृद्धेची धारदार शस्त्राने अनेक वार करून निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 20:49 IST

याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मृत महिलेचं नाव  रिटा रॉनी रॉड्रिग्स (वय  60 ) असं आहे. 

मीरारोड - मीरारोडच्या आलिशान अशा पूनम गार्डन वसाहतीत एकट्याच राहणाऱ्या एका वृद्धेची धारदार शस्त्राने अनेक वार करून निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मृत महिलेचं नाव  रिटा रॉनी रॉड्रिग्स (वय  60 ) असं आहे. 

रिटा यांचे पती सुमारे 7 वर्षां पूर्वी मरण पावले असून त्या या ठिकाणी एकट्याच रहात होत्या. कनकिया भागातील ओस्तवाल हाईट्समध्ये त्यांचे इस्टेट एजंटचे आर.पी.उपाध्याय यांच्यासोबत भागीदारीत कार्यालय होते . त्या ठिकाणी खाद्यपदार्थांचा सुद्धा जोडधंदा त्यांनी सुरु केला होता . सप्टेंबर महिन्यात त्यांच्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली होती. येत्या 21 नोव्हेंबर रोजी वयाची साठी साजरी करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. मात्र, रविवार दुपारपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. सोमवारी रात्री त्यांच्या मैत्रिणीने इमारतीतील परिचित महिलेला रिटा यांची माहिती घेण्यास सांगितले. ती महिला रखवालदारासह घरी पहायला गेली असता रिटा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या.   

 

पोलिसांनी फॉरेन्सिक पथकास पाचारण केले असता तेथील काही नमुने त्यांनी तपासासाठी घेतले आहेत. जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. पोलिसांनी मृत महिलेच्या भाऊ - बहीण आदी नातेवाईक, मैत्रिणी, भागीदार उपाध्यायसह अन्य इस्टेट एजंट, रखवालदार, मोलकरीण आदींची चौकशी सुरु केली आहे. इमारतीतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु आहे. रिटा यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी त्यांचे लॅपटॉप, घड्याळ, मोबाईल आदी मौल्यवान वस्तू इतरत्र पडलेल्या होत्या. त्यामुळे चोरीच्या हेतूने नव्हे तर व्यावसायिक वाद वा अन्य वादाच्या कारणांनी हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वसंत लब्दे यांनी वर्तवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून