धक्कादायक! गुप्तांगावर मिरची पावडर टाकून विवाहितेला बेदम मारहाण; आरोपी महिला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 12:34 PM2020-05-21T12:34:54+5:302020-05-21T12:35:35+5:30

माहितीनुसार, रामपूरा कोटडा येथील विवाहित महिलेला शेजारील महिलेने डांबून तिला मारहाण केली

Shocking! Beating a married woman by throwing chilli powder on her private part pnm | धक्कादायक! गुप्तांगावर मिरची पावडर टाकून विवाहितेला बेदम मारहाण; आरोपी महिला फरार

धक्कादायक! गुप्तांगावर मिरची पावडर टाकून विवाहितेला बेदम मारहाण; आरोपी महिला फरार

Next

बाडमेर – राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात शिव ठाणे परिसरात एका विवाहित महिलेच्या गुप्तांग आणि डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

माहितीनुसार, रामपूरा कोटडा येथील विवाहित महिलेला शेजारील महिलेने डांबून तिला मारहाण केली. इतकचं नाही तर आरोपीने पीडितेच्या गुप्तांगावर आणि डोळ्यात मिरची पावडर टाकली. पीडितेची मुलं धनारामा यांच्या घरासमोरून जात होते. त्यावेळी धनाराम यांची पत्नी गजू देवी आणि मुलगी हेमी यांनी मुलांना थांबवून मारहाण केली आणि तिथून पळवून लावलं.

मुलांनी घरी येऊन घडलेला प्रकार पीडित महिलेला सांगितला तेव्हा ती जाब विचारण्यासाठी धनाराम यांच्या घरी पोहचली. या कारणावरुन भडकलेल्या आरोपी महिलांनी पीडितेला मारहाण केली. पीडितेला रस्सीने बांधून मारहाण करत गुप्तांग आणि डोळ्यात मिरची पावडर टाकली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडित महिलेच्या पतीने तिथे पोहचून आरोपींच्या जाळ्यातून तिची सुटका केली. जखमी अवस्थेत पतीने महिलेला रुग्णालयात दाखल केले. मागील ५ दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरु आहेत. पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बाडमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खीवसिंह भाटी यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पीडितेवर रुग्णालयावर उपचार सुरु आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरी धाड टाकली त्यावेळी आरोपी घरात नव्हते, सध्या फरार आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे

Web Title: Shocking! Beating a married woman by throwing chilli powder on her private part pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस