धक्कादायक... सहा महिन्यांत तब्बल 1.13 लाख कोटींचे बँक घोटाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 08:19 AM2019-12-28T08:19:16+5:302019-12-28T08:19:34+5:30

2018-19 मध्ये बँकांनी एकूण 71,543 कोटी रुपयांची 6801 प्रकरणे उघड केली होती.

Shocking ... Bank scams worth 1.13 lakh crore in six months | धक्कादायक... सहा महिन्यांत तब्बल 1.13 लाख कोटींचे बँक घोटाळे

धक्कादायक... सहा महिन्यांत तब्बल 1.13 लाख कोटींचे बँक घोटाळे

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून बँकांमध्ये घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे. यंदा तर पहिल्या सहामाहीमध्ये तब्बल 1.13 लाख कोटींचे घोटाळे उघड झाले आहेत. यातील काही प्रकरणांची माहिती बँकेला उशिराने मिळाली.  आरबीआयने जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचे 4412 प्रकार घडले आहेत. याद्वारे एकूण 1.13 लाख कोटींची रक्कम अडकली आहे. 


2018-19 मध्ये बँकांनी एकूण 71,543 कोटी रुपयांची 6801 प्रकरणे उघड केली होती. आरबीआयच्या अहवालानुसार 2018-19, 2019-20 च्या पहिल्या सहामाहीमध्ये देण्यात आलेल्या माहितीवरून असे लक्षात येत आहे की, घोटाळा झाल्याचा काळ आणि त्याची माहिती मिळाल्याच्या काळ यामध्ये बरेच अंतर आहे. 


2018-19 मध्यये जेवढ्या रक्कमेची अफरातफर झाल्याचे सांगिण्यात आले त्यापैकी 90.6 टक्के रक्कमेचे गैरव्यवहार 2000-01 आणि 2017-18 मध्ये झाले आहेत. अशाचप्रकारे 2019-20 च्या पहिल्या सहामाहीमध्ये जी माहिती देण्यात आली त्यापैकी 97.3 टक्के प्रकरणे जुनी आहेत. पहिल्या सहामाहीमध्ये बँकांनी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याची 398 प्रकरणे निदर्शनास आणली होती. 

Web Title: Shocking ... Bank scams worth 1.13 lakh crore in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.