भोपाळ : गेल्या महिन्यात देशातील सर्वात मोठे आणि हायप्रोफाईल 'सेक्स स्कँडल' उघड झाले. यामध्ये मध्य प्रदेशसह देशभरातील मोठमोठे राजकीय नेते अडकलेले आहेत. या टोळीकडून केवळ कंत्राटे, खंडणी उकळण्याचीच कामे करण्यात आलेली नसून लोकसभा निवडणुकीतही नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे व्हिडीओ कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर येत आहे.
हनी ट्रॅप कांडमुळे देशातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. यामध्ये भाजपासह अन्य पक्षांतील नेतेही सहभागी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आधी हे प्रकरण केवळ कंत्राटे मिळविण्यासाठी 'सेक्स स्कँडल' करण्यात आल्याचे पुढे आले होते. मात्र, नंतर या प्रकरणाची व्याप्ती एवढी वाढली की, जवळपास 4 हजार व्हिडीओ क्लीप आणि करोडो रुपयांची खंडणी एवढ्यावर पोहोचली. यानंतर या व्हिडीओंचा वापर या स्कँडलमध्ये अडकलेल्या नेत्यांच्या विरोधात करण्याचा प्रयत्न झाला. यासाठी त्या नेत्याच्या विरोधकांना हे व्हिडीओ विकण्याचे प्रयत्न झाले.
विधानसभा निवडणुकीपासून गणिते बिघडलीअनेक मोठ्या नेत्यांचे तरुणींसोबतचे अश्लिल व्हिडीओ 30 कोटींना विकण्याचा प्रयत्न झाला. मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्याने नव्या सरकारच्या काळात या महिलांचा हस्तक्षेप कमी होत चालला होता. यामुळे या महिलांनी सरकारशी संबंधीत संघटना आणि काँग्रेसच्या काही नेत्यांसह विरोध पक्ष बनलेल्या भाजपाच्या नेत्यांशी संपर्क सुरू ठेवला होता.