शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलगी झाल्याची ईर्ष्या; मोठ्या काकीने चिमुरडीला पाण्यात बुडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 16:39 IST

या भीषण हत्येच्या बातमीने गावकरी हैराण झाले. मुलीच्या कुटूंबालाही घटनेचा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देधक्कादायक म्हणजे खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी मुलीच्या मोठ्या काकीला अटक केली आहे.टेमारी गावात घराच्या छतावर पाण्याच्या टाकीच्या आत एका मुलीचा मृतदेह आढळला.

रायपूर - घरातच टेरेसवर एका चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 1 वर्षाच्या चिमुकलीची पाण्याच्या टाकीत बुडून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी मुलीच्या मोठ्या काकीला अटक केली आहे. माना पोलीस स्टेशन परिसरातील टेमरी या गावात एका वर्षाच्या निरागस मुलीची छतावरील पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून हत्या केली. या भीषण हत्येच्या बातमीने गावकरी हैराण झाले. मुलीच्या कुटूंबालाही घटनेचा धक्का बसला आहे.माना पोलिस स्टेशनचे प्रभारी दुर्गेश रावटे यांनी सांगितले की, टेमारी गावात घराच्या छतावर पाण्याच्या टाकीच्या आत एका मुलीचा मृतदेह आढळला. मुलीच्या कुटूंबाच्या चौकशीदरम्यान मुलीच्या आईने सांगितले की आपण सकाळी मुलीला दूध दिले व तिला खोलीत झोपायला दिले आणि काही अंघोळीसाठी निघून गेली. काही वेळाने ती परत आली तेव्हा खोलीत मुलगी नव्हती.बराच वेळ शोध घेतल्यानंतर छतावरील टाकी व घराकडे लोकांचे लक्ष गेले. टाकीच्या झाकणावर लाकडाचा एक जड ब्लॉक ठेवण्यात आला होता. झाकण उघडून एका मुलीला पाण्यात बुडवून आत सोडले होते. तिला जिवंत समजून कुटुंबीयांनी आंबेडकर रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार,मुलगी असल्याच्या ईर्ष्येने आरोपी राजेश्वरी साहूने गीतांजली साहू या 1 वर्षाच्या मुलीची हत्या केली. 21 एप्रिल रोजी 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. टेमरी गावात घरातील पाण्याच्या टाकीमध्ये एक वर्षाच्या मुलगी गीतांजली साहूचा मृतदेह सापडला.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना मृताची मोठी काकी राजेश्वरी साहू सतत आपले वक्तव्य बदलत असल्याचे निदर्शनास आले. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक