शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

धक्कादायक! एकाच घरातील तिघांची हत्या, रक्ताच्या थारोळ्यात पडले होते मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 21:52 IST

खून झालेल्या तिघांमध्ये पती, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे ही खळबळजनक घटना बलौदाबाजारमधील पलारी पोलिस स्टेशन परिसरातील चेरकडीह गावची आहे.जेव्हा घरातील इतर सदस्य त्यांच्या खोल्यांमधून खाली आले, तेव्हा तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

लॉकडाऊनदरम्यान देशभरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही शनिवार-रविवारीदरम्यानच्या मध्यरात्री छत्तीसगडमधील बलौदाबाजार शहरात खळबळजनक गुन्हा घडला आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांची येथे हत्या झाली. खून झालेल्या तिघांमध्ये पती, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. मात्र या घटनेमागील कारण पुढे आले नाही किंवा आरोपींचीही ओळख पटली नाही.ही खळबळजनक घटना बलौदाबाजारमधील पलारी पोलिस स्टेशन परिसरातील चेरकडीह गावची आहे. गावात साहू कुटुंबातील तीन जणांची घरातच हत्या करण्यात आली. तिघांना धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. घरातही मोठ्या प्रमाणात रक्त पसरले होते.मृतांमध्ये घराचा प्रमुख यशवंत साहू (४७ वर्षे), त्याची पत्नी माहेश्वरी साहू (४५ वर्षे) आणि मुलगा देवेंद्र (१७ वर्षे) यांचा समावेश आहे. घटनेच्या रात्री उर्वरित सदस्यही घरी उपस्थित होते, जे दुसऱ्या खोलीत झोपले होते, त्यांचे प्राण वाचले.एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, एकाच घरात इतकी मोठी घटना घडून देखील घरातील बाकीच्या सदस्यांनाही याबद्दल माहिती नव्हती. त्याचवेळी, जेव्हा घरातील इतर सदस्य त्यांच्या खोल्यांमधून खाली आले, तेव्हा तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या घटनेत वाचलेल्यांनी पलारी पोलिस स्टेशनच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक आणि श्वानपथकाच्या मदतीने पुराव्यांचा शोध सुरू केला.बलौदाबाजारचे एसडीओपी सिद्धार्थ बघेल यांनी माहिती देताना सांगितले की, घटनेची माहिती मिळताच एसपी प्रशांत ठाकूर यांच्यासह पोलिसांची संपूर्ण पथक घटनास्थळी पोचले आणि या प्रकरणाच्या चौकशीत सामील झाले. एकाच कुटुंबातील तीन जणांना ठार मारल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या खुनांकडे लूट, जुना वाद आणि प्रेम प्रकरण यादृष्टीने तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसFamilyपरिवार