शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! युट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने केला प्रेयसीच्या गर्भपाताचा प्रयत्न, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 21:17 IST

या प्रकरणात पाथिरीवेदु पोलिसांनी २७ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.

ठळक मुद्देसंशयित एस. सौंदर (२७) हा गुम्मिडीपुडीजवळील कम्मरपालम येथील रहिवासी आहे. लग्नाला अडचण येत असल्याने दोघांनी अर्भक गर्भातून काढण्याचा निर्णय घेतला. तिरुवल्लूर जिल्ह्याचे एसपी पी. अरविंद यांनी सांगितले की, तरुणीच्या जबाबावरून तरुणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे. 

चेन्नई - युट्यूबवरील व्हिडिओ पाहून गरोदर असणाऱ्या आपल्या १९ वर्षीय प्रेयसीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्याचा धक्कादायक प्रकार चेन्नईमधील तिरुवल्लूर येथे घडला आहे. या सर्व प्रकारामुळे तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर चेन्नईमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पाथिरीवेदु पोलिसांनी २७ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, संशयित एस. सौंदर (२७) हा गुम्मिडीपुडीजवळील कम्मरपालम येथील रहिवासी आहे. तो एलपीजी सिलिंडर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि त्याचे एका १९ वर्षीय तरुणीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी महाविद्यालयात बी.कॉम द्वितीय वर्षात शिकत होती. या तरुणीला दिवस गेल्याने ती गर्भवती राहिली.पण सौंदरच्या कुटूंबाचा विरोध असल्याने हे जोडपे लग्न करू शकले नाहीत. त्यानंतर लग्नाला अडचण येत असल्याने दोघांनी अर्भक गर्भातून काढण्याचा निर्णय घेतला. तरुणी सात महिन्यांची गरोदर होती. नंतर युट्युबवर नवजात बालकाच्या डिलिव्हरीचे व्हिडीओ पहिले आणि सौंदरने प्रेयसीवर शस्त्रक्रिया करायचे ठरविले. त्याला तरुणीने देखील सहमती दर्शवली. त्यानुसार सौंदरने तिला दुचाकीवरुन काजूच्या शेतात नेले, जिथे त्याने  यूट्यूब व्हिडिओंद्वारे तिच्यावर शस्त्रक्रिया केली. दरम्यान अर्भकाचा खांद्यांकडील अवयव मोडला आणि तरुणीला खूप रक्तस्राव होऊ लागला. त्याने तिला आपल्या मोटारसायकलवरून गावापासून २५ किमी दूर असलेल्या गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटलला नेले. त्यानंतर तिला रॉयपुरम येथील शासकीय राजा सर रामास्वामी मुदलीयार लेट-इन हॉस्पिटलमध्ये रूग्णवाहिकेत नेण्यात आले आणि तेथेच तिने एका बाळाला जन्म दिला. नंतर तरुणीला अँब्युलन्समधून रोयापुरममधील शासकीय राजा सर रामास्वामी मुदलीयार लाईंग - इन हॉस्पिटलमध्ये दाखल केल.   

तिच्यासोबत आलेल्या तरुणाला रुग्णालयाच्या आवारात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुण आणि तरुणीच्या पालकांची चौकशी केली जात आहे. तिरुवल्लूर जिल्ह्याचे एसपी पी. अरविंद यांनी सांगितले की, तरुणीच्या जबाबावरून तरुणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसChennaiचेन्नईYouTubeयु ट्यूब