शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक.! पूर्ववैमनस्यातून घरात घुसून तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 14:05 IST

हा हल्ला घरगुती कारणास्तव झाल्याची माहिती पोलिसांनी दिली...

ठळक मुद्देबारामती शहरातील घटना : एकाच आठवड्यातील तिसरा खूनी  हल्ला  तरुणी मानेवर, तोंडावर, हातावर वार झाल्याने गंभीर जखमी आरोपीस २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

बारामती : बारामती शहरातील प्रगतीनगर शेळकेवस्ती येथे पूर्ववैमनस्यातून घरात घुसून २६ वर्षीय तरुणीवर धारदार सत्तूराने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि 22)रात्री घडली. ही तरुणी मानेवर, तोंडावर, हातावर वार झाल्याने गंभीर जखमी झाली  आहे. रुबिना कुरेशी असे खुनी हल्ला झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत फिर्यादी हसीना गुलाब कुरेशी ( वय ६५ रा. खाटीकगल्ली, बारामती, सध्या रा. शेलकेवस्ती तांदुळवाडी) यांनी आरोपी अरबाज (आब्बू) अल्ताप कुरेशी रा.खाटीक गल्ली बारामती (ता. बारामती ) याच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (दि.२१)   रात्री  ९  वाजण्याच्या सुमारास बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरातील  शेळकेवस्ती तांदुळवाडी येथे हा प्रकार घडला .याच आठवड्यात खूनी हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे.     पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीस अटक करून बारामती प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता २५ तारखेपर्यंत पोलीस सुनावण्यात आली आहे.  या घटनेमुळे खळबळ उडाली आहे .याच आठवड्यात एका अल्पवयीन मुलीवर पूर्ववैमनस्यातून खूनी हल्ला करण्यात आला होता .यामध्ये तिचा मृत्यु झाला. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या खुनाचे गूढ उकलले आहे. तर गुरुवार ( दि.२० ) रोजी काटेवाडी येथे तरुणावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आणखी एका तरुणीवर  खूनी हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला घरगुती कारणास्तव झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या तरुणीची प्रकृती गंभीर आहे. येथील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी तरुणीला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा व त्यांच्यात गल्लीतील खेळण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद मध्यस्थी करून मिटवण्यात आला होता. मात्र, तोच राग आरोपी अरबाज (आब्बू) अल्ताप कुरेशी  याने मनात धरून फिर्यादीच्या घरात शिरून  हातातील धारधार लोखंडी सत्तूराने  मानेवर तोंडावर हातावर वार करून गंभीर जखमी केले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक