शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

धक्कादायक! प्रेमसंबंधात ४ वर्षांची लेक ठरली अडथळा, लिव्हइनमध्ये राहणाऱ्या आईनेच घोटला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:20 IST

एका आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून आपल्याच पोटच्या चिमुकलीचा जीव घेतला. आईचा क्रूरपणा इथेच संपला नाही. तिने मुलीच्या मृतदेहाला एक प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून भाड्याच्या घरात लवपून ठेवला.

आई आणि तिच्या पोटी जन्माला येणारं मूल यांचं नात हे जगातील सगळ्यात श्रेष्ठ नातं असतं, असं म्हटलं जातं. मात्र, याच नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. राजस्थानच्या बारां गावामध्ये एका आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून आपल्याच पोटच्या चिमुकलीचा जीव घेतला. आईचा क्रूरपणा इथेच संपला नाही. तिने मुलीच्या मृतदेहाला एक प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून भाड्याच्या घरात लवपून ठेवला आणि ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत फरार झाली. बंद घरातून वास येऊ लागल्यावर घर मालकाने दरवाजा उगडला आणि कपाटातून येणारे रक्त पाहून घाबरला. यानंतर तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. 

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, घरातील बंद कपाट उघडले. या बंद कपाटातील एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेला चिमुकलीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. या मुलीचे नाव इशिका असून, त्याच घरात भाड्याने राहणाऱ्या महिलेची मुलगी असल्याचे समोर आले. आईनेच तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून या मुलीची हत्या केली यांनो नंतर दोघे तिथून पसार झाले. 

प्लॅस्टिकची पिशवी कपाटात लपवली!

सहाय्यक उप निरीक्षक हुकूमचंद नागर यांनी माहिती देताना सांगितले की, गावातील जयराम बैरवा यांनी आपल्या बंद घरातील कपाटातून दुर्गंध येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कपाट उघडून पाहिले असता त्यातील एका प्लॅस्टिकच्या पिशवीत लहान मुलीचा मृतदेह असल्याचे दिसले. ही मुलगी ४ वर्षांची इशिका होती. ती आई रोशन बाई आणि तिचा लिव्हइन पार्टनर महावीरसोबत या घरात राहत होती. या मुलीचा मृतदेह ओढणीत गुंडाळून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून कपाटात ठेवण्यात आला होता. आता तिचा मृतदेह भवरगढच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

गळा दाबून चिमुकलीला संपवलं!

महावीर आणि रोशन बाई यांनी जयपूरमध्ये इशिकाची हत्या केली आणि मृतदेह लपवण्यासाठी, तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी ते जैतपुरा इथे गेले. जयपूरहून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सांगानेर रेल्वे स्थानकाजवळ घडली. याच ठिकाणी महावीर आणि रोशनबाईंनी दोन दिवसांपूर्वी इशिकाचा गळा दाबून खून केला. 

आरोपी आई सात महिन्यांपासून महावीरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. इशिकाच्या आईचे पहिले लग्न टोंक येथील रविंदर बैरवाशी झाले होते. इशिका त्याची मुलगी होती. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी तक्रारदार जयराम बैरवा यांच्याकडे सोपवला. सध्या या आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान