शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वसईत 4 लहान मुलांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 19:13 IST

लहान मुले अपहरण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांची डोकेदुःखी

ठळक मुद्देअलीकडे वयोगट 1 ते 10 या मुलांना चोरून नेण्याचे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत. पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेत असून अपहरण झालेल्या चारही मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चारही मुलांच्या घरच्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला.

 

नालासोपारा - वसई तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी पाठोपाठ लहान मुलांचे अपहरणाचे प्रकार थांबता थांबेना झाले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण अधिकच वाढू लागला आहे. तालुक्यात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरी पाठोपाठ आता लहान मुले पळवण्याचे किंवा ठरविण्याचे प्रमाण वाढले झाली आहे. चारही मुलांच्या घरच्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र,  ते सापडले नसल्याने शेवटी घरच्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन कोणीतरी, कसले तरी आमिष दाखवून मुलांना पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनीअपहरणाचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेत असून अपहरण झालेल्या चारही मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे.अलीकडे वयोगट 1 ते 10 या मुलांना चोरून नेण्याचे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरामधील रस्त्यावरील सिग्नलवर भिका मागण्यांसाठी अशा छोट्या मुलांना प्रचंड मागणी आहे. राज्यातून आलेल्या कमी उत्पन गटातील कुटुंबाच्या मुलांना हमखास पळवून नेण्यात आल्याचे असंख्य प्रकार घडले आहे. एकंदरित मुलं पळवून नेऊन आणि स्वखुशीने गरिबीच्या चटक्यामुळे मुलं विक्रीचा गोरखधंदा म्हणजे पोलिसांना एक आव्हानच ठरले आहे.नालासोपारा पूर्वेकडील नगीनदास पाडा ओमनगर येथील रोझ अपार्टमेंटमधील गाळा नंबर 3 मध्ये राहणाऱ्या विभागात राहणाऱ्या मनिता अमरजित कौशल (39) यांचा मुलगा अरमान (8) हा मंगळवारी सकाळी 8 ते दुपारी 2 च्या सुमारास राहत्या घरातून कोणीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. घरच्यांनी त्याला भरपूर शोधले पण तो सापडलाच नाही. शेवटी तुळींज पोलीस ठाण्याला जाऊन मुलगा सापडत नसल्याची तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील राम रहीम चाळीच्या बाजूला राहणारे रिंकू उर्फ राजूमिश्रि रामप्यारे शर्मा (39) यांचा मुलगा अनबुरा (13) हा शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजूला खेळण्यासाठी गेला होता पण तो अद्यापपर्यंत परतलाच नाही. घरच्यांनी त्याला भरपूर शोधले पण न भेटल्याने शेवटी मंगळवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.विरार पूर्वेकडील चंदनसार येथील आरटीओ ऑफिससमोरील चाळीत रूम नंबर 9 मध्ये राहणाऱ्या दीपा संजय चौधरी (26) यांची मुलगी ईशानी (3.5 वर्ष) ही सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता घराच्या बाहेर खेळत असताना तिला पूस लावून अपहरण केले आहे. घरच्यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तर दुसरीकडे विरार पूर्वेकडील वीर सावरकर रोडवरील साइराज अपार्टमेंटमध्ये रूम नंबर 202 मध्ये राहणाऱ्या संतु कांबळे (48) यांची मुलगी स्नेहा (17) हिचेही आमिष व पूस लावून अपहरण केले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस