शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची पुण्यात हत्या; कसबा पेठेमध्ये तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 9:02 AM

Dipak Maratkar murder in pune: राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिवसेना युवा सेनेचे कसबा विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर ५ ते ६ जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने शहराच्या मध्य वस्तीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे़ 

दीपक विजय मारटकर हे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जेवण करुन घराबाहेर बसले होते. यावेळी मोटारसायकलवरुन ५ ते ६ जण आले. त्यांनी तीक्ष्ण हत्याराने दीपक यांच्यावर सपासप वार केले व पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपक यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला.

माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे दीपक मारटकर हे पुत्र होत. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दीपक मारटकर उभे होते़. त्यांच्याविरोधात अश्विनी कांबळे याही उभ्या होत्या. शिवसेनेतील एक नेते महेंद्र सराफ हेही तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना शिवसेनेचे तिकीट मिळाले नाही. याबाबत सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितले की, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सनी कोलते व इतरांनी ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांना संशयितांची नावे समजली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMurderखून