शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वसईत महिला पत्रकाराला शिवसैनिकाने केली भररस्त्यात अश्लील शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:57 IST

शेखर वैद्य या शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.  

ठळक मुद्देया प्रकरणी वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सर्वतोपरी सहकार्य करून आरोपीला अटकअश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत घडला आहे.

वसई - एका मराठी वृत्तपत्राच्या वसई तालुक्याच्या महिला पत्रकाराला शिवसेनेच्या कार्यकर्त्याने अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत घडला आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात शेखर वैद्य या शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.  

महिला पत्रकार वैष्णवी राऊत यांना भररस्त्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास शेखर वैद्य यांनी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र (NUJM) पालघर जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करीत असून आरोपी शेखर वैद्य याला पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर शासन देण्याची मागणी संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर, कोषाध्यक्ष वैशाली आहेर, सचिव सीमा भोईर यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई, उपाध्यक्ष उमाकांत वाघ, सचिव अनिल पाटील कोषाध्यक्ष रवींद्र घरत, सत्यवान तरे यांनी केली आहे. जर या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सर्वतोपरी सहकार्य करून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याचे सांगितले आहे.  

महिलांचा सन्मान व्हायलाच हवा शिवरायांच्या या पवित्र भूमीत शिवसेना पक्षाचे हे कार्यकर्ते महिला पत्रकाराला अभद्र भाषेत धमकावण्याचे निंदनीय काम करत आहेत. अशा बेताल शेखर वैद्य यांच्यावर वसई पोलीसांनी व शिवसेना पक्षानेही कठोर कारवाई करावी अशी मागणी एनयुजेएम अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVasai Virarवसई विरारArrestअटक