शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शिवसेनेने दिली २ कोटींची ऑफर; आदित्य ठाकरेंविरोधातील उमेदवार पोलिसांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 13:58 IST

वरळी पोलीस ठाण्यात तक्रार

ठळक मुद्देआदित्य ठाकरेविरोधातील उमेदवारी मागे घेण्यासाठी २ कोटींची ऑफरया कॉलनंतर त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीसही त्यांच्यासोबत देण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांचे नाव सांगत ठाण्यातील एका व्यक्तीने कॉल करून ही ऑफर दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

मुंबई - आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या वंचितच उमेदवार गौतम गायकवाड यांना माघार घेण्यासाठी २ कोटींची ऑफर देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव सांगत ठाण्यातील एका व्यक्तीने कॉल करून ही ऑफर दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या कॉलनंतर त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीसही त्यांच्यासोबत देण्यात आला आहे.गायकवाड यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांना शिवसेनेकडून कॉल सुरु आहेत. गुरुवारी आनंद दिघे यांच्या विश्वासू आणि जवळच्या कार्यकर्त्यानी त्यांची दादर परिसरात भेट घेत, त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी २ कोटींची ऑफर दिली. तसेच ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभ्या असलेल्या वंचित उमेदवारालाही 25 लाख देणार असल्याचे सांगून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी अप्पर पोलीस आयुक्ताकड़े लेखी तक्रार दिली. या कॉलमागे नेमके कोण आहेत याचा शोध घेण्याची विनंती गायकवाड यांनी पोलिसांना केली आहे. त्यानुसार वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत. यामागे एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून हे कॉल येत असल्याचा संशयही गायकवाड़ यांनी वर्तवला आहे.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी गौतम गायकवाड यांना देण्यात आली असून गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वंचितने माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गायकवाड यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे गायकवाड यांनी माहिती दिली. या मतदारसंघातून अन्य पक्षासह राज ठाकरेंनीही आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही माघार घ्या, अशी मागणी त्यांच्याकड़े करण्यात आली होती असे देखील त्यांनी पुढे माहिती दिली. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी