शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज कुंद्राच्या पॉर्न फिल्मबद्दल शिल्पा शेट्टीला पूर्ण कल्पना; शर्लिन चोप्राचा पोलिसांकडे दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 06:55 IST

८ तासांच्या चौकशीत उघडले ‘राज’

जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीला तिचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवत असल्याबद्दल पूर्ण कल्पना होती. मात्र, आता ते खोटे बोलत आहेत, याची मला माहिती नाही, असा धक्कादायक जबाब अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे नोंदविला असल्याचे समजते.गुन्हे विभागाच्या मालमत्ता कक्षाने शुक्रवारी सुमारे ८ तास शर्लिनची कसून चौकशी केली. त्यामध्ये तिने या प्रकरणातील कुंद्राचे अनेक ‘राज’ उलगडले आहेत. तिच्या जबाबाच्या अनुषंगाने पुराव्याची पडताळणी करून आणखी काही जणांकडे चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.अश्लील चित्रपट बनवून वेब सिरीजद्वारे त्याचे वितरण केल्याच्या आरोपाखाली मालमत्ता कक्षाने १९ जुलैला राज कुंद्राला आणि त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्पला अटक केली आहे.शर्लिनने जबाबात सांगितले आहे की, राज कुंद्राशी पहिली भेट २३ जून २०१९ रोजी डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर त्याच्याशी व त्याच्या मॅनेजरशी भेटून कामासंबंधी करार करण्यात आले. त्यानुसार मी एअरप्राइमसाठी ३ व्हिडिओ शूट केले. मात्र, हॉटशॉटसाठी एकही व्हिडिओ दिलेला नाही. शिल्पा शेट्टीच्या स्ट्रिम कंपनीबरोबरही ३ व्हिडिओ बनविले. त्याचे मानधन आपल्याला अजूनही देण्यात आलेले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर मी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ती मागे घेण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आणण्यात आला, त्यानंतर पॉर्न फिल्मचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती, असेही तिने जबाबात म्हटले असल्याचे सांगण्यात आले आहे. राज हा आपले फोटो व व्हिडिओ शिल्पाला आवडतात असे सांगून माझी स्तुती करायचा. त्यामुळे मला काम करण्यात आनंद मिळत होता, असे तिने नमूद केले आहे.अनेक तरुणींची करण्यात आली फसवणूकबोल्ड फोटो व शूटिंगसाठी राज कुंद्रा व त्याचे सहकारी सर्वजण असे व्हिडिओ बनवतात, असे सांगून त्यासाठी प्रेरित करीत असे. त्यांच्या शूटची सुरुवात बोल्डपासून सुरू होऊन नग्नतेपर्यंत जात असे. त्यांनी अनेक तरुणींची अशा प्रकारे फसवणूक केली आहे. त्या पीडितांचे जबाब नोंदविले गेल्यास धक्कादायक माहिती समोर येईल, असेही शर्लिन चोप्रा हिने जबाबामध्ये सांगितले असल्याचे समजते.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टी