शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टावर तिने पाठविले न्युड फोटो; तरुणीला तो म्हणाला, व्हायरलच करतो!

By प्रदीप भाकरे | Updated: December 7, 2022 13:36 IST

सायबर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास ‘मिस्टर बेफिकरा’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा चालक रोहन पाटील (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर) याच्याविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला.

प्रदीप भाकरे 

अमरावती: येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थीनीने इन्स्टावरील एक अकाउंटवरून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली अन् ती फसल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ती फ्रेंड रिक्वेस्ट तिला पोलीस ठाण्याच्या दारापर्यंत घेऊन गेली. त्याने इन्स्टावर पाठविलेले तिचेच न्युड फोटो सोशली व्हायरल करण्याची धमकी दिली. पाणी डोक्यावरून गेल्याने अखेर तिने ६ डिसेंबर रोजी सायबर पोलीस ठाणे गाठले.             सायबर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास ‘मिस्टर बेफिकरा’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा चालक रोहन पाटील (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर) याच्याविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला. येथील एका महाविदयालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी व वसतीगृहात राहणाऱ्या तरूणीला मिस्टर बेफिकरा या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती तिने स्विकारली. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. संवाद वाढला. दरम्यान काही दिवसांनी ती आपल्या प्रेमजाळात पुरती अडकली, हे हेरून त्याने तिला विवस्त्र छायाचित्रे पाठविण्यास सांगितली. तिने देखील ती पाठविली. त्यानंतर काही दिवसांनी त्याने तिला भेटण्याची गळ घातली. भेटून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास तगादा लावला. त्याने त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र, शरीरसंबंध प्रस्थापित न केल्यास इन्स्टाग्रामवरील चॅटिंग सोशल मिडियासह तिच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून काहीही हशील झाले नाही. अखेर तिने कुटंबाला विश्वासात घेऊन ही बाब सांगितली. त्यांनी देखील तिला धीर देत पोलीस तक्रार करण्यास सुचविले. सायबरच्या ठाणेदार सीमा दाताळकर व सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र सहारे यांनी त्या इंजिनिअर तरूणीची फिर्याद नोंदवून घेतली. तिला विश्वास देखील दिला, आता सायबर पोलिसांनी ते अकाउंड ब्लॉक केले.

व्हेरिफिकेशन न करता सोशल मीडियावर ओळख करु नका

व्हेरिफाय न करता सोशल मिडियावर कुणाही अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. समोरच्या अनोळखी व्यक्तीचे प्रोफाईल पाहून हुरळून जाऊ नका. मोहात पडून चूक करू नका. ती क्षणाची चूक तुम्हाला आयुष्यभर मनस्ताप देऊ शकते.

डॉ. आरती सिंह, 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामamravati-acअमरावतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस