शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:21 IST

सोनम आणि राज हे दोघेही हत्येचे सूत्रधार म्हणून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजचे म्हणणे आहे की, हा सर्व सोनमच्या डोक्यातील कट होता.

Raja Raghuvanshi Case : इंदूरच्या राजा रघुवंशी याच्या मेघालयमध्ये झालेल्या हत्येला जवळजवळ २० दिवस उलटले तरी, या प्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. पोलिसांनी राजाची पत्नी सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज यांच्यासह पाच आरोपींना अटक केली असली तरी, या भीषण हत्येचा खरा सूत्रधार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजाला कायमचे संपवण्याचा पहिला विचार कोणाच्या मनात आला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सोनम आणि राज हे दोघेही हत्येचे सूत्रधार म्हणून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजचे म्हणणे आहे की, हा सर्व सोनमच्या डोक्यातील कट होता. तो स्वतः मेघालयला गेला नव्हता आणि कंत्राटी मारेकऱ्यांनीही सुरुवातीला खून करण्यास नकार दिला होता. मात्र, सोनमने त्यांना १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून हे कृत्य करण्यास भाग पाडले, असा राजचा दावा आहे.

'ऑपरेशन हनिमून' आणि गुंतागुंतीचा तपासराज आणि सोनम यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपामुळे मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) मोठा पेच निर्माण झाला आहे. आरोपींचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि घटनाक्रम यांची सांगड घालून पोलीस प्रत्येक धागा उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. 'ऑपरेशन हनिमून' या मोहिमेअंतर्गत, एसआयटीने मेघालयसोबतच इंदूर आणि गाझीपूर येथूनही महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. राज, राजा आणि सोनम हे इंदूरचे रहिवासी आहेत, तर हत्येतील अन्य आरोपींना उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून अटक करण्यात आली आहे.

राजचे धक्कादायक दावेपोलिसांच्या चौकशीदरम्यान, राज कुशवाहाने दावा केला आहे की त्याने शेवटच्या क्षणी मेघालयला जाण्यास नकार दिला होता आणि इतरांनाही तिथे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. हिंदुस्तान टाईम्सने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, "राज कुशवाहाने दावा केला की, तो सोनमला पाठिंबा देऊ इच्छित नव्हता आणि शेवटच्या क्षणी मेघालयला जाण्याचा बेत रद्द केला. त्याने इतरांनाही तिथे जाण्यापासून रोखले होते, परंतु सोनमने तिकिटे बुक केल्यानंतर ते मेघालय पाहण्यासाठी गेले."

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "राज म्हणतो की, शेवटच्या क्षणी इतर आरोपींनीही राजाला मारण्यास नकार दिला, परंतु सोनमने तसे करण्याचा आग्रह धरला आणि १५ लाख रुपये देऊन त्यांना राजी केले." पोलीस राजच्या या दाव्यांची कसून पडताळणी करत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंत्राटी मारेकरी अयशस्वी ठरले असते, तर सोनम स्वतः राजाला डोंगरावरून ढकलून मारण्यास तयार होती, असेही म्हटले जात आहे.

हनिमूनचा शेवट रक्तरंजितराजा आणि सोनमचे ११ मे रोजी लग्न झाले होते. २० जून रोजी ते दोघे हनिमूनसाठी निघाले. गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते शिलाँगला गेले. तिथे अचानक ते दोघे बेपत्ता झाले. जवळपास १० दिवसांनी, २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. धारदार शस्त्राने त्याची हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याचे समोर आले. आतापर्यंतच्या तपासात, सोनमने तिचा कथित प्रियकर राज आणि त्याच्या तीन मित्रांसह राजाची हत्या केल्याचे दिसून आले आहे. तथापि, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्याच्यासाठी राजाची हत्या करण्यात आली होती, त्या व्यक्तीचे नावही समोर येऊ शकते. सोनमने राजाचा केवळ मोहरा म्हणून उपयोग केला असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू