शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ओटीपी’ शेअर केल्यास बँक खाते होईल रिकामे, सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 02:20 IST

कोरोना संसर्गाच्या संकटामुळे ऑनलाइन व्यवहार वाढत असताना सायबर गुन्ह्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यामुळे याबाबत मुंबईकरांना जागरूक करण्यासाठी विलेपार्ले पोलिसांनी एक व्हिडीओ बनवून नागरिकांना सतर्क करण्यास सुरुवात केली  आहे.

मुंबई : कोरोना संसर्गाच्या संकटामुळे ऑनलाइन व्यवहार वाढत असताना सायबर गुन्ह्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यामुळे याबाबत मुंबईकरांना जागरूक करण्यासाठी विलेपार्ले पोलिसांनी एक व्हिडीओ बनवून नागरिकांना सतर्क करण्यास सुरुवात केली  आहे. ‘बँक कधीही तुमची खासगी माहिती विचारत नाही, त्यामुळे ओटीपी शेअर करू नका’, असा संदेश व्हिडीओद्वारे दिला जात आहे.  विलेपार्ले पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी हा व्हिडीओ तयार करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ज्या बँकेत आपले खाते आहे त्याच बँकेतून बोलत असल्याचा आव आणत सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या बोलण्यात गुंतवून त्यानंतर खासगी माहिती, एटीएमचा पिन किंवा ओटीपी क्रमांक मागतात. यातील बऱ्याच आराेपींना कॉल सेंटरमधील कामाचा अनुभव असल्याने त्यांच्या बोलण्यात सामान्य नागरिक तसेच विशेषतः ज्येष्ठ नागरिक फसल्याची बरीच प्रकरणे आहेत.त्यामुळे स्वतःच्या बँक खात्याची खासगी माहिती ज्यात ओटीपी, पिन क्रमांक यांचा समावेश आहे ती कधीच फोनवर उघड करू नका. कारण, बँक कधीच ग्राहकांचे खासगी डिटेल्स मागत नाही, ही बाब काणे यांनी व्हिडीओमार्फत स्पष्ट केली. हा व्हिडीओ सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाल्याने महिला आणि वृद्ध यामुळे सतर्क राहून आपल्या बँक खात्याला रिकामे होण्यापासून वाचवू शकतील, असा विश्वास विलेपार्ले पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीस