शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

शेअर ट्रेडिंग फसवणूक; ३ संचालकांना जामीन, विलेपार्ले पोलिसांकडून अधिक तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 09:21 IST

share trading fraud: शेअर ट्रेडिंगमधील कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या अर्थ वृद्धी सिक्युरीटीज प्रा. लि. या ट्रेडिंग कंपनीच्या तिन्ही संचालकांना अटीशर्तीसह जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई : शेअर ट्रेडिंगमधील कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या अर्थ वृद्धी सिक्युरीटीज प्रा. लि. या ट्रेडिंग कंपनीच्या तिन्ही संचालकांना अटीशर्तीसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार सुनील गिरी यांच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिसांनी अर्थ वृद्धी सिक्युरीटीज प्रा. लि. या ट्रेडिंग कंपनीचे संचालक धीरेंद्र शुक्ला, अनुराग शुक्ला, सुनील जैन व बिझनेस कंन्सलटंट जयराज बाफना यांच्याविरोधात २१ जुलै रोजी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यात तिघांना अटक झाली. याच, प्रकरणात सुनील जैन यांच्यासह अन्य संचालकांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.

दिंडोशी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जे. खान यांच्या खंडपीठाने जामिनावर सुनावणी करताना नोंदविलेल्या निरीक्षणात, तक्रारदार व त्यांच्या पत्नीने ०१ जुलै २०१९ ते ०५ जुलै २०२१ पर्यंत एकूण १,४७,०९,१५० रुपये शेअर मार्केटमध्ये संबंधित कंपनीमार्फत गुंतवले. आरोप असलेल्या संचालकांसह इतर आरोपींनी बनावट कागदपत्राद्वारे तक्रारदाराचे शेअर्स कमी दराने त्यांच्या नातेवाइकांना विकून ७९,६२,०४९ रुपयांची फसवणूक केली. तसेच गुंतवलेली रक्कमही परत न दिल्याचा आरोप आहे.

प्रकरण काय? कागदपत्रानुसार, तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील व्यवहार २०१९ ते २०२० पर्यंत सुरळीत होते. २०१९ पासून त्यांच्यात वाद सुरू झाले. तसेच, नावे सारखीच असल्याने जे भाग विकले ते नातेवाइकांनाच विकले हे ग्राह्य धरले जाऊ शकत नाही असे नमूद करण्यात आले. 

 नॅशनल स्टॉक एक्स्चेंज गुंतवणूकदार तक्रार निवारण समितीने या प्रकरणाचा निर्णय घेत अर्थ वृद्धीला तक्रारदाराने गमावलेली रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शेअर मार्केटमधील शेअर्सच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असतात आणि तक्रारदारासह गुंतवणूकदारांना नफा आणि तोटा यासाठीही तयार राहावे लागेल. शेअर्सच्या व्यवसायात फक्त नफा होईल, तोटा होणार नाही अशी हमी आरोपीसह कोणीही देऊ शकत नाही असेही निरीक्षण जैन यांच्या जामीन अर्जावेळी नोंदविण्यात आले आहे.     याप्रकरणाचा तपास आधीच पूर्ण झाला आहे. तसेच, आरोपी कोर्टाने घातलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करण्यास तयार असल्याने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जैन यांच्यासह तिन्ही संचालकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Stock Marketशेअर बाजारCrime Newsगुन्हेगारी