शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लाजिरवाणी घटना! गरोदर महिलेच्या घरात घुसून केला बलात्कार; प्रकृती चिंताजनक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 20:48 IST

Rape on Pregnent Women : या प्रकरणासंदर्भात डीएसपी म्हणतात की, आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

ठळक मुद्दे मुंगेर येथील मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील मिर्जापूर बरदह गावची ही घटना आहे, जिथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने गर्भवती महिलेसोबत बलात्काराची घटना घडवून आणली.

बिहारमधील मुंगेरमधून माणुसकीला लाजविणारी घटना समोर आली आहे. दिवसा ढवळ्या घरात घुसून एका मध्यमवयीन व्यक्तीने १९ वर्षीय गर्भवती महिलेवर बलात्कार केला. महिलेला प्रकृती चिंताजनक स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणासंदर्भात डीएसपी म्हणतात की, आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.गर्भवती महिलेवर बलात्कारमुंगेर येथील मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील मिर्जापूर बरदह गावची ही घटना आहे, जिथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने गर्भवती महिलेसोबत बलात्काराची घटना घडवून आणली. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा गुजरातमध्ये ट्रक चालवतो आणि घरी ती जावेसह राहते. पीडित महिलेने पुढे सांगितले की, ती जेव्हा घरी एकटी होती तेव्हा शेजारच्या भागात राहणाऱ्या आरोपीने घरात घुसून चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला.

चाकूचा धाक दाखवून  महिलेवर बलात्कारया प्रकरणात पीडितेच्या जावेने पोलिसांना सांगितले की, आरोपीने त्यांना नेहमी त्रास दिला. जेव्हा जेव्हा पीडितेला पाणी आणण्यासाठी त्याच्या घरी जावे लागत असे तेव्हा तो तिला त्रास देत असे आणि चुकीच्या मार्गाने तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असे.पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला     या प्रकरणात सदर डीएसपी नंद जी प्रसाद यांनी सांगितले की, मिरजापूर बरादा या गावात एक विवाहित महिला राहते आणि तिचा नवरा गुजरातमध्ये ट्रक चालवित आहे आणि जेव्हा ती घरी एकटी होती, तेव्हा गावातील एक ५० वर्षीय तरुण तिच्या घरात घुसला आणि दुष्कर्म घडवून आणले. सदर महिलेला उपचारासाठी सदर रुग्णालयात आणण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपीला पकडण्यासाठी छापेमारी करण्यात येत आहे. तो सध्या फरार आहे. ही पीडित महिला गर्भवती आहे की नाही याचीही चौकशी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक