हरियाणामधील गुरुग्राममधील सेक्टर - ४४ मधील फोर्टिस हॉस्पिटलविरोधात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पीडित मुलीच्या आरोपांनुसार, मुलगी जेव्हा आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होती, तेव्हा तिच्यावर बलात्कार केला होता. जेव्हा ती बेशुद्ध होती,तेव्हा ही घटना घडविण्यात आल्याचा आरोप मुलीने केला आहे. पीडितेने आरोपीचे नाव विकास असल्याचे सांगितले असून त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू केला आहे.पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ वर्षीय मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला गुरुग्राममधील रुग्णालयात २१ ऑक्टोबरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर २२ ऑक्टोबरला तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, ६ दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर मुलीने तिचा लैंगिक छळ झाला असल्याची तक्रार कुटुंबीयांकडे केली. २२ ते २७ दरम्यान ही लाजिरवाणी घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एसीपीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व्हेंटिलेटरवर असून सध्या जबाब देण्यात आरोग्याच्या दृष्टीने फिट नाही आहे. मात्र तिने हावभावाने आणि काही लिहून देऊन तिच्या वडिलांना या घटनेचा खुलासा केला आहे. तसेच रुग्णालय प्रशासन पोलिसांच्या तपासात सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फोर्टिस हॉस्पिटलने देखील आपली बाजू मांडताना सांगितले की, आरोपी दोषी आढळल्यास त्याला दया दाखवली जाणार नाही. त्याच्यावर योग्य कारवाई करण्यास पोलिसांना मदत करू.
लज्जास्पद! २१ वर्षीय रुग्णावर व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयाच्या स्टाफने केला बलात्कार
By पूनम अपराज | Updated: October 31, 2020 19:58 IST
Rape : पीडितेने आरोपीचे नाव विकास असल्याचे सांगितले असून त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू केला आहे.
लज्जास्पद! २१ वर्षीय रुग्णावर व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयाच्या स्टाफने केला बलात्कार
ठळक मुद्देपीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ वर्षीय मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला गुरुग्राममधील रुग्णालयात २१ ऑक्टोबरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.