शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:45 IST

कर्जात अडकल्यानंतर एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं. भावांनी आणि मित्रांनी साथ दिली नाही. फक्त विश्वासघात झाला.

यूपीच्या शाहजहांपूर जिल्ह्यात कर्जात अडकल्यानंतर एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं. भावांनी आणि मित्रांनी साथ दिली नाही. फक्त विश्वासघात झाला. त्यामुळे एका व्यावसायिकाने पत्नी आणि ३ वर्षांच्या निष्पाप मुलासह आपलं जीवन संपवलं. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं. शाहजहांपूरच्या रोजा पोलीस स्टेशन परिसरातील दुर्गा एन्क्लेव्ह कॉलनीत ही घटना घडली.

व्यावसायिक सचिन ग्रोव्हर त्याची पत्नी शिवांगी आणि निष्पाप मुलगा फतेहसह राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सचिनने त्याच्या व्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. त्याला या कर्जावर सरकारकडून मोठी सबसिडी मिळणार होती, पण येथूनच त्याचा त्रास सुरू झाला. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सबसिडी देण्यासाठी २५ लाख रुपयांची लाच मागत होते.

सचिनने आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून ३३ पानांची सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये सचिनने आपली व्यथा मांडली. एसपी राजेश द्विवेदी म्हणाले की, सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू आहे. पती-पत्नीने मुलासह आत्महत्या केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

सचिनने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, "जोपर्यंत हे पत्र कोणाला मिळेल तोपर्यंत मी सचिन ग्रोव्हर, माझी पत्नी शिवांगी, माझा मुलगा फतेह, माझं आयुष्य, माझं जग, हे सर्व काही संपून जाईल. आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं कारण बरेलीमध्ये व्यवसाय सुरू करणं होतं. लॉकडाऊन दरम्यान व्यवसायात मोठं नुकसान झालं आणि कर्जाचा भार वाढतच गेला."

"माझी फॅक्ट्री, माझ्या सासरच्यांचं घर आणि त्यांचे दागिने सर्व गहाण ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर माझे सासरे, मेहुणा आणि माझ्या पत्नीने मला आर्थिक आणि नैतिक आधार देऊन या तणावातून बाहेर काढलं. पण माझ्या स्वतःच्या कुटुंबाने मला अजिबात पाठिंबा दिला नाही." सचिनने आपल्या सुसाईड नोटमध्ये काही लोकांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश