शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लहाग्यांचे अश्लील व्हिडीओ दाखवून नराधमांनी केले लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 20:53 IST

नराधमांनी चार मुली वगळता आणखी काही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे.

ठळक मुद्देतपासात ज्या गोष्टींचा खुलासा झाला त्याने पोलीस देखील चक्रावले.आतापर्यंत या संदर्भात चार तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.एका महिलेला हे नराधम नऊ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत गैरप्रकार करत असताना दिसले.

टिटवाळा - लहान मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनीअटक केली आहे. माधव मगर आणि विश्वनाथ तरणे असं या दोन नराधमांची नावे आहेत. याप्रकरणी टिटवाळा पोलीस तपास करत असून आतापर्यंत चार पीडित लहान मुलींचे शोषण केल्याची माहिती उघड झाली आहे. नराधमांनी चार मुली वगळता आणखी काही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.पीडित मुलीच्या आईने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विश्वनाथ आणि माधवला अटक करून पुढील तपास सुरू केला. तपासात ज्या गोष्टींचा खुलासा झाला त्याने पोलीस देखील चक्रावले. कारण या दोन नराधमांनी अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत या संदर्भात चार तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.

टिटवाळा येथील एका शाळेसमोर माधव मगर आणि विश्वनाथ तरणे या दोन नराधमांचे समोसा - वडापाव विक्रीचे दुकान आणि चायनिज सेंटर आहे. हे दोघे नराधम शाळेच्यावेळेत लहान मुलींना शाळेच्या परिसरात घेऊन जात आणि त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवत. याशिवाय मुलींसोबत अश्लील चाळे देखील करत असत. दरम्यान, एका महिलेला हे नराधम नऊ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत गैरप्रकार करत असताना दिसले. त्या महिलेने तातडीने पीडित मुलीच्या आईला याबाबत माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन सविस्तर माहिती काढली. त्यावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक