शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल; कोल्डिंगमधून दिले होते गुंगीचे औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 12:12 IST

लैंगिक अत्याचार करत त्याचे फोटो व विडिओ रेकॉर्डिंग नातेवाइकांना दाखवण्याची दिली धमकी..

ठळक मुद्देसध्या या पोलीस निरीक्षकाची सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे नेमणूक

पुणे : फ्लॅट दाखविण्यासाठी नेऊन कोल्डिंगमधून गुंगीचे औषध पाजून लैंगिक अत्याचार करणाऱ्या व त्याचे फोटो व व्हिडिओ रेकॉडिंग नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.चंद्रकांत भगवानराव माने असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सध्या त्यांची नेमणूक सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आहे. याप्रकरणी एका ५० वर्षाच्या महिलेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २००९ पासून आतापर्यंत सुरु होता.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत माने हे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यात कार्यरत असताना त्यांची या महिलेबरोबर ओळख झाली. भवानी पेठेतील एक घर दाखविण्यासाठी माने याने या महिलेला नेले.तेथे कोल्डिंग्समधून तिला गुंगीचे औषध पाजले़ तिला गुंगी आल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला.तसेच त्या प्रकाराचे फोटो व व्हिडिओ रेकॉडिंग केले. हा प्रकार समजल्यावर त्याने तिला हे फोटो व व्हिडिओ दाखवून ते नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. तिला लवकरच लग्न करुन असे आश्वासन देऊन तिच्याबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिने अनेकदा लग्नाविषयी विचारल्यावर त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केली तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली.१७ फेबुवारी २०२० रोजी माने याने फिर्यादीच्या मोबाईलवर व्हॉटस अपवर स्वत:चे अश्लिल फोटो पाठविले. त्यानंतर लॉकडाऊनमध्येही त्याने आपल्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.चंद्रकांत माने हे पुण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते.त्यावेळी २००९ मध्ये या प्रकाराला सुरुवात झाली आहे. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबतचे पुरावे पोलीस गोळा करीत असल्याचे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसRapeबलात्कार