हरियाणा - हरियाणामध्ये बहिण- भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाने बहिणीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. २४ वर्षीय तरुणी गुरुग्राम येथे परीक्षा देण्यासाठी आली होती. बलात्काराची ही घटना एका हॉटेलमध्ये घडली आहे. महेंद्रगड येथील रहिवासी पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुरुग्रामचे पोलीस पीआरओ सुभाष बोकन यांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्रगडमध्ये झीरो एफआयआर अन्य कलमान्वये दाखल झाल्यानंतर गुरुग्राममधील महिला पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तपास प्राथमिक टप्प्यात असून पीडितेचा जबाब नोंदविण्यात आलं आहे. पीडित तरुणी परीक्षा देण्यासाठी गुरुग्राम येथे आली होती, असं पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. तिच्या चुलतभावाची परीक्षा केंद्रात भेट झाली. यानंतर चुलतभावाने तिला हॉटेलमध्ये एकत्र राहण्यास सांगितले. त्यांनी मिळून सिटी बसस्टँडजवळील हॉटेलमध्ये भाड्याने रम घेतली. बोकन म्हणाले की, पीडित महिला रात्री रूममध्ये झोपली होती, त्यावेळी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबद्दल कोणाला वाच्यता केल्यास याचा परिणाम वाईट होईल असे सांगून तरुणाने तिला धमकावले. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतलं असून आता पुढील तपास सुरू आहे.
नात्याला काळिमा! परीक्षा देण्यासाठी आलेल्या बहिणीचे भावाने केले लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 22:18 IST
बलात्काराची ही घटना एका हॉटेलमध्ये घडली आहे.
नात्याला काळिमा! परीक्षा देण्यासाठी आलेल्या बहिणीचे भावाने केले लैंगिक शोषण
ठळक मुद्दे२४ वर्षीय तरुणी गुरुग्राम येथे परीक्षा देण्यासाठी आली होती. महेंद्रगड येथील रहिवासी पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतलं असून आता पुढील तपास सुरू आहे.