मुलीवर लैंगिक अत्याचार;  तिघांना पाच वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 02:03 AM2021-01-06T02:03:01+5:302021-01-06T02:03:13+5:30

Crime News : कळवा, वाघोबानगर येथे राहणाऱ्या पीडित मुलीला त्याच परिसरातील आरोपी मंगल चौधरी आणि वरुण उपाध्याय यांनी गुंगीचे औषध लावलेल्या रुमालाचा वास दिला होता.

Sexual abuse of a girl; All three were sentenced to five years in prison | मुलीवर लैंगिक अत्याचार;  तिघांना पाच वर्षे कारावास

मुलीवर लैंगिक अत्याचार;  तिघांना पाच वर्षे कारावास

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मंगल चौधरी (२१, रा. कळवा, ठाणे), वरुण उपाध्याय (१९, रा. वाघोबानगर, ठाणे) आणि भूपेंद्र विश्वकर्मा (२०, रा. वाघोबानगर) या तिघा आरोपींना ठाणे न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची, तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


कळवा, वाघोबानगर येथे राहणाऱ्या पीडित मुलीला त्याच परिसरातील आरोपी मंगल चौधरी आणि वरुण उपाध्याय यांनी गुंगीचे औषध लावलेल्या रुमालाचा वास दिला होता. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला पळवून नेऊन तिच्यावर भूपेंद्र, तसेच अन्य एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना १४ एप्रिल, २०१४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. 


या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे, पळवून नेणे, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम आदी कलमांखाली पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपी मंगल आणि वरुण यांना १५ एप्रिल, २०१४ रोजी, भूपेंद्र याला १४ जून रोजी, तर अन्य एका अल्पवयीन आरोपीला १९ एप्रिल, २०१४ रोजी अटक केली होती. यामध्ये पाचवा आरोपी मात्र फरार झाला होता. पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून जमादार ज्ञानेश्वर ताजणे यांनी तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहळकर यांनी काम पाहिले. 


सर्व बाजू पडताळल्यानंतर ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सोमवारी तिन्ही आरोपींना प्रत्येक कलमाखाली प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावासाची, तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यातील चौथा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची भिवंडी येथील बाल न्यायालयात सुनावणी होणार आहे.दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चौथा आरोपी अल्पवयीन 
n या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे, पळवून नेणे, तसेचसंरक्षण अधिनियम आदी कलमांखाली पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. 
n यातील चौथा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची भिवंडी येथील बाल न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Web Title: Sexual abuse of a girl; All three were sentenced to five years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.