शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

वेटर्सच्या नावाखाली चालवलं जात होतं सेक्स रॅकेट; ४० जणींची सुटका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 17:48 IST

एपीएमसीमधल्या मॅफ्को मार्केटमध्ये ब्लू स्टार हॉटेलवर छापा टाकला.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून ४० जणींची सुटका केली. या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या आणखी काही वेटर्ससुद्धा सेक्स वर्कर म्हणून काम करत असल्याचं निष्पन्न झालं.

नवी मुंबईनवी मुंबईतील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून ४० जणींची सुटका केली. एका सामाजिक संस्थेने (एनजीओ) नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने एपीएमसीमधल्या मॅफ्को मार्केटमध्ये ब्लू स्टार हॉटेलवर छापा टाकला.

ग्राहकाने केलेल्या मागणूनूसार  हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी एका मुलीला जवळच्याच प्रिन्स लॉजमध्ये पाठवायचं कबूल केलं. त्यासाठी त्या ग्राहकाला ५ हजार रुपये मोजावे लागले. हे पैसे दिल्यानंतर ग्राहक लॉजमध्ये गेला त्यावेळी एक मुलगी तिथे वाट पाहत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी ब्लू स्टार हॉटेलच्या दोन व्यवस्थापकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर दोन कॅशियर आणि एका वेटरलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.छापा टाकून पोलिसांनी ४० जणांची सुटका केली. त्यात एक १७ वर्षीय मुलगी देखील पोलिसांना आढळून आली. दरम्यान, या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या आणखी काही वेटर्ससुद्धा सेक्स वर्कर म्हणून काम करत असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी त्यानंतर तेथील बारवर देखील छापा टाकला आणि 39 महिलांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटProstitutionवेश्याव्यवसायNavi Mumbaiनवी मुंबईArrestअटकPoliceपोलिसraidधाड