शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नागपुरातील हॉटेल क्रिष्णामध्ये सेक्स रॅकेट : पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:35 IST

अत्यंत वर्दळीच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या हॉटेल क्रिष्णामध्ये पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा घातला. यावेळी पोलिसांना तेथे कॉन्ट्रॅक्टवर आणलेल्या दोनपैकी एक परप्रांतिय सेक्स वर्कर ग्राहकाशी भलत्याच लीला करताना आढळली.

ठळक मुद्देपरप्रांतिय सेक्स वर्कर सापडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्यंत वर्दळीच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या हॉटेल क्रिष्णामध्ये पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा घातला. यावेळी पोलिसांना तेथे कॉन्ट्रॅक्टवर आणलेल्या दोनपैकी एक परप्रांतिय सेक्स वर्कर ग्राहकाशी भलत्याच लीला करताना आढळली. तिला, तिच्यासोबत असलेल्या आणि या दोघींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.गणेशपेठ बसस्थानकानजिक फ्लॅगशिप क्रिष्णा ओयो हॉटेल आहे. येथे अहमदनगरचा रहिवासी असलेला आरोपी रेहान ऊर्फ रमजान पटेल (वय ३०) हा पिंटू ऊर्फ किशोर भीमराव कांबळे (वय ३५) याच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवित असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला (एसएसबी) लागली. त्याची शहानिशा करून घेतल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी क्रिष्णा हॉटेलमध्ये पोलिसांनी आपला पंटर पाठवला. त्याने पिंटू कांबळेची भेट घेतली. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील वेश्या उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवित आरोपी पिंटूने प्रति तासाला पाच हजार रुपये मागितले. तेथेच रूमही उपलब्ध करून दिली. पंटरच्या रूममध्ये वारांगना शिरताच पिंटूने त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले. त्याचवेळी पोलिसांनी तेथे छापा मारून पिंटूला, पंटरच्या ताब्यातील आणि बाजूच्या रूममध्ये असलेल्या वारांगनेला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकल्याने हॉटेलमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्याचा फायदा उठवत आरोपी रेहान पळून गेला. पोलिसांनी आरोपी रेहान आणि पिंटूविरुद्ध गणेशपेठ ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पिंटूला अटक करण्यात आली तर रेहानचा शोध घेतला जात आहे.पुन्हा वळवळ सुरू !उपराजधानीत गेल्या काही वर्षांत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचे नेटवर्क चांगलेच वाढले आहे. प्रारंभी ब्युटी पार्लर, मसाज पार्लरमधून हा गोरखधंदा चालायचा. आता जागेसोबतच स्वरूपही बदलले आहे. सेक्स रॅकेट चालविणारी मंडळी मोठमोठ्या हॉटेलमध्ये पॉश रूम बुक करतात. वेगवेगळ्या प्रांतासह रशियन बालाही बोलवून घेतात. १५ दिवस ते १ महिना असा त्यांचा करार असतो. त्यासाठी त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. बदल्यात त्यांच्याकडून दररोज वेश्याव्यवसाय करवून घेत दलाल लाखो रुपये कमवितात. अलिकडे या धंद्यात महिला गुंतल्या आहेत. त्यातील काही पोलिसांच्याही संपर्कात राहतात. प्रतिस्पर्धी व्यावसायिकेची माहिती पोलिसांना देऊन त्या पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:ला सेफ करून घेतात. त्याच तोडपाण्याचीही नंतर व्यवस्था करून घेतात. त्यांच्या मध्यस्थीमुळे एसीबीचाही धोका टळतो. त्यामुळे काही जण अशा महिलांच्या निरंतर संपर्कात राहतात.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटhotelहॉटेलPoliceपोलिसraidधाड