शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात थाई मुलींकडून सेक्स रॅकेट: विदेशी महिलेकडे भारतीय आधार आणि पॅनकार्ड

By जितेंद्र कालेकर | Updated: June 26, 2024 20:27 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: पॅनकार्ड पुरविणाऱ्याला पुण्यातून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: थायलंडच्या तरुणींचा २५ हजारांमध्ये सौदा होत असल्याचे उघड केल्यानंतर यातील विदेशी दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने नुकतीच अटक केली. तिच्या तावडीतून तीन विदेशी पिडित मुलींची सुटका केली. याच चौकशीमध्ये विदेशी महिलेला भारतीय पॅनकार्ड आणि आधारकार्ड पुरविणाऱ्या  बागडी अब्दुलाह साद (रा. पुणे, मुळ रा. येमेन देश) यालाही अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली.

या सेक्स रॅकेट प्रकरणामध्ये अटक केलेल्या थायलंड देशाच्या दलाल महिलेकडे थायलंडचा पासपोर्ट तसेच बागडी याच्याकडे येमेन देशाचा मुदत संपलेला पासपोर्ट आणि व्हिजा मिळाला आहे. ते दोघेही विनापरवाना भारतात वास्तव्य करीत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यासह भारतीय पारपत्र कायद्याखालीही गुन्हा दाखल झाला आहे. मुळचा येमेन देशातील बागडी आणि विदेशी तरुणींच्या मदतीने शरीर विक्रयाचा व्यवसाय चालविणारी दलाल महिला यांची ओळख नेमकी कशी झाली? त्याने तिला कोणाच्या मदतीने भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्ड पुरविले, याचा तपास आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. विदेशी तरुणींना अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करुन देणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक वनिता पाटील या अधिक तपास करीत आहेत.अशी झाली कारवाई-ठाणे शहर परिसरात तसेच मुंबई, लोणावळा, गोवा अशा वेगवेगळया ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून थायलंडसारख्या देशातील मुली आणि महिलांना फूस लावून काही गिऱ्हाईकांकडे पाठविले जात असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे सामाजिक कार्येकर्ते बिनू वर्गीस यांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने २१ जून २०२४ रोजी ठाण्यातील लुईसवाडीतील एका हॉटेलमध्ये छापा टाकून थायलंडच्या  दलाल महिलेला अटक केली. तिच्या तावडीतून तीन थायलंडच्या  मुलींची सुटका केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेट