शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

मुंबईत १ कोटी ९ लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:21 IST

निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने गुरुवारी आणि शुक्रवारी एकूण १ कोटी ९ लाखांची रक्कम जप्त केली आहे

ठळक मुद्देत्याच्याकडे 10 लाख रुपये रक्कम आढळून आली. गाडीत एकूण 49 लाख 98 हजार 500 रुपये रक्कम आढळुन आली.या तिनही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उपआयुक्त अधिक चौकशी करीत आहेत.

मुंबई : निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने गुरुवारी आणि शुक्रवारी एकूण १ कोटी ९ लाखांची रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे.घाटकोपर पूर्वेकडील मॉल परिसरालगत वाहनांची तपासणी सुरू असताना, शुक्रवारी अक्षय शहा (२२) याच्या कारमधून ३४ लाखांची रोकड जप्त केली गेली. भंगार विक्रीच्या व्यवहारातील ती रक्कम असल्याचे शहाचे म्हणणे आहे. एसएसटी क्रमांक १ चे पथक प्रमुख दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या रकमेबाबत आयकर विभाग अधिक तपास करीत आहे. या रकमेचे राजकीय कनेक्शन आहे का? त्या संबंधित कागदपत्रांबाबत ते कसून चौकशी करीत आहेत.तर, मुंबई शहर जिल्ह्यात गुरुवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ७५ लाख रुपयांची संशयित रक्कम पकडली. गुरुवारी मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील गोल देऊळ एस.व्ही.पी. रोड स्थिर तपासणी पथकाने एका हुन्दई कारची तपासणी केली. या गाडीमध्ये प्रदीप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला यांच्याकडे १० लाखांची रोकड सापडली.तसेच भायखळा येथील तांबीट नाका येथे स्थिर तपासणी पथकाने एका गाडीची तपासणी केली असता, गाडीत एकूण ४९ लाख ९८ हजार ५०० रुपयांची रक्कम आढळून आली. तर राणीबागेजवळ एका ईको स्पोर्ट्स फोर्डच्या तपासणीत १५ लाखांची रक्कम पथकाने जप्त केली. या तीनही प्रकरणांबाबत आयकर विभागाडून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMONEYपैसा