शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

झवेरी बाजारातून एक कोटीच्या रोकडसह सहा किलो सोने जप्त; सराफासह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 21:05 IST

दिपक रमेशलाल गिरला ( रा. उल्हासनगर), रिदमल गंगाराम परियार ( रा. रिद्धी सिद्धी बिल्डिंग, भुलेश्वर), प्रकाश देवीचंद सोनी उर्फ प्रविण ( रा. आरएनपी पार्क, काशी विश्वनाथ मंदिर, भाईंदर), व नितीन राठोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याची बिस्कीटं बनविण्याचे साहित्य, साचे जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे झवेरी बाजार येथील एका दुकानावर छापा टाकून एक कोटीच्या रोकडीसह चार किलो सोन्याची बिस्कीटे व बार जप्त केले. रिदमल परियार याचे झवेरी बाजारमध्ये मुंबई ज्वेलर्स नावाचे दुकान असून तो तस्करीतील सोन्याचे बिस्कीट बनवित होता.राठोड याला जामीन मिळाला आहे तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मुंबई - दुबईतून तस्करी करुन आणलेले सोने मुंबईत भारतीय बनावटीची म्हणून खपविणारे रॅकेट महसुल गुप्तचर महासंचालनालयाच्या पथकाने (डीआरए) आज उध्वस्त केले आहे. झवेरी बाजार येथील एका दुकानावर छापा टाकून एक कोटीच्या रोकडसह चार किलो सोन्याची बिस्कीटे व बार जप्त केले. याप्रकरणी सुवर्ण व्यावसायिकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.दिपक रमेशलाल गिरला ( रा. उल्हासनगर), रिदमल गंगाराम परियार ( रा. रिद्धी सिद्धी बिल्डिंग, भुलेश्वर), प्रकाश देवीचंद सोनी उर्फ प्रविण ( रा. आरएनपी पार्क, काशी विश्वनाथ मंदिर, भाईंदर), व नितीन राठोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याची बिस्कीटं बनविण्याचे साहित्य, साचे जप्त करण्यात आले आहे. रिदमल परियार याचे झवेरी बाजारमध्ये मुंबई ज्वेलर्स नावाचे दुकान असून तो तस्करीतील सोन्याचे बिस्कीट बनवित होता.गेल्या काही महिन्यापासून दुबईतून सोन्याची तस्करी करुन भारतीय बनावटीची सोन्याची बिस्कीट बनविली जात होती, याबाबत झवेरी बाजार येथील अन्य काही व्यावसायिक रडारवर असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. झवेरी बाजार येथील मोतीशा चाळीत काम करीत असलेल्या प्रकाश सोनी उर्फ प्रविण याने तस्करीतून आयात केलेल्या सोन्याच्या बारमधून काही बिस्कीट बाळगली असल्याची माहिती डीआरएच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी छापा टाकल्यानंतर १५ सोन्याचे बार मिळाले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील परियार याच्या दुकानात छापा टाकून पथकाने एक कोटी १ लाख २६ हजारची रोकड तसेच एकूण ६.०२२ किलो सोन्याचे बार व बिस्कीटे जप्त केली. दुबईतून सोने आणल्यानंतर ते मुंबईत वितळविले जात होते. त्यानंतर ‘मेड इन इंडिया’ नावाने बिस्कीटे बनविली जात होते. याप्रकरणी राठोड याला जामीन मिळाला आहे तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  

 

टॅग्स :Directorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयArrestअटकGoldसोनं